‘पीएम मोदी’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित

| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर तयार करण्यात आलेली बायोपिक ‘पीएम नरेंद्र मोदी’ सध्या चर्चेत आहे. आज मुंबईत या चित्रपटाचे पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आलं. चित्रपटाचे पोस्टर्स मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चित्रपटात अभिनेता विवेक ऑबेरॉय याने नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट येत्या 5 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. पीएम नरेंद्र मोदी […]

पीएम मोदी चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित
Follow us on

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर तयार करण्यात आलेली बायोपिक ‘पीएम नरेंद्र मोदी’ सध्या चर्चेत आहे. आज मुंबईत या चित्रपटाचे पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आलं. चित्रपटाचे पोस्टर्स मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चित्रपटात अभिनेता विवेक ऑबेरॉय याने नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट येत्या 5 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

पीएम नरेंद्र मोदी चित्रपटात विवेक ऑबेरॉयचे वडील सुरेश ऑबेरॉयही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सुरेश ऑबेराय यांनी एक संताची भूमिका साकारली आहे. ही एक काल्पनिक भूमिका असून महत्त्वाची आहे. ही भूमिका निभवण्यासाठी 100 पेक्षा अधिक चित्रपटात काम केलेला अभिनेता व्यवस्थित पार पाडू शकतो. सुरेश ऑबेरॉय चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक निर्माते आहेत, असं चित्रपटाचे निर्माते संदीप सिंह म्हणाले.


पीएम नरेंद्र मोदी चित्रपट 12 एप्रिल रोजी प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. विवेक ऑबेरॉयचा महत्वकांक्षी चित्रपट लोकसभा निवडणूकीच्या पूर्वी सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. सध्या चित्रपटावर राजकराण सुरु असल्याचे गंभीर आरोप केले जात आहे.

मोदींच्या या चित्रपटातील विवेक ऑबेरॉयच्या भूमिकेवरही काहींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. पोस्टर्समधील अभिनेता अजिबात मोदींसारखे दिसत नसल्याचेही काहींनी म्हटलं आहे. चाहत्यांनी तर मोदींची भूमिका परेश रावल यांना द्यावी असा सल्ला दिला.