पर्यटकांना जम्मू-काश्मीर सोडण्याची सूचना, विमानांचं तिकीट चार हजारावरुन 20 हजारावर

| Updated on: Aug 03, 2019 | 8:02 PM

सरकारने यात्रेकरु आणि पर्यटकांना जम्मू-काश्मीर रिकामं करण्यास सांगितलं. याचा फायदा घेत विमान कंपन्यांनी नफा कमावण्यासाठी विमानाच्या तिकिट दरात तातडीने वाढ झाली.

पर्यटकांना जम्मू-काश्मीर सोडण्याची सूचना, विमानांचं तिकीट चार हजारावरुन 20 हजारावर
Follow us on

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचं सावट असल्याने ही यात्रा अर्ध्यातच रोखण्यात आली आहे. तसेच, पर्यटक आणि यात्रेकरुंना लवकरात लवकर काश्मीर रिकामं करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर यात्रा अर्ध्यावर सोडून जाणाऱ्या भाविकांना परतण्यासाठीही धडपड करावी लागत आहे. कारण, सरकारच्या सूचनेनंतर विमानांचं तिकीट तब्बल पाच पटीने महागलं आहे.

सरकारने यात्रेकरु आणि पर्यटकांना जम्मू-काश्मीर रिकामं करण्यास सांगितलं. याचा फायदा घेत विमान कंपन्यांनी नफा कमावण्यासाठी विमानाच्या तिकिट दरात तातडीने वाढ झाली. श्रीनगर ते दिल्ली येणाऱ्या फ्लाईट्सचं भाड्यात पटकन वाढ झाली. जिथे शुक्रवारी श्रीनगर ते दिल्लीचं विमान भाडं 4 हजार रुपयांच्या जवळपास होतं, तिथे शनिवारी हे भाडं दुप्पट म्हणजेच 8 हजार रुपये इतकं झालं. तर रविवारी यामध्ये आणखी वाढ होऊन हे भाडं 20 हजार रुपयांच्याही वर गेलं.

खासगी कंपनी ‘गो एअर’च्या श्रीनगर ते दिल्ली येणाऱ्या रविवारी सकाळच्या 11.10 मिनिटांच्या फ्लाईटचं भाडं 18,289 रुपये इतकं होतं. हे वाढलेलं भाडं पाहून प्रवासी पुरते हैराण झाले. तर ‘विस्तारा’ कंपनीच्या दुपारी 1.45 मिनिटांच्या फ्लाईटचं भाडं 17,306 रुपयांवर पोहोचलं. त्याशिवाय, ‘स्पाईज जेट’ आणि ‘एअर एशिया’ या कंपन्यांच्या फ्लाईटच्या भाड्यातही 10 हजारांचा वाढ करण्यात आली आहे. श्रीनगर ते दिल्ली यादरम्यानचं फ्लाईटचं भाडं हे इतरवेळी साधारणपणे चार हजारांच्या जवळपास असतं.

पाहा व्हिडीओ :