नवी दिल्ली : भारत आणि चीनसीमेवरील तणाव जून महिन्यापासून वाढला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे दोन महत्वाचे नेते भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क एस्पर आणि विदेश मंत्री माईक पोम्पिओ भारत दौऱ्यावर येणार असल्याची घोषणा मंगळवारी करण्यात आली आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला दररोज चिनी आक्रमकतेचा सामना करावा लागत आहे, असे मार्क एस्पर यांनी म्हटले. भारत आणि अमेरिकेदरम्यान 2+2 स्तरावरील तिसऱ्या फेरतील चर्चा होत आहे. (Foreign and Defence Minister of America will visit India)
हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागरामध्ये चीनच्या वाढत्या प्रभावाची या दौऱ्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. चीनसोबत भारताचे संबंध ताणलेले असताना अमेरिकेच्या महत्वाच्या नेत्यांचे भारत दौरे दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंध मजबूत करणारे आहेत. अटलांटिक परिषदेदरम्यान एस्पर यांनी भारताविषयी भाष्य केले होते.
भारत आणि अमेरिकेतील संबंध आणखी मजबूत होण्यास मदत होणार असल्याचे मत एस्पर यांनी व्यक्त केले. दोन्ही देशांमध्ये इंटेलीजेंस शेअरिंगबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. भारत जगातील बुद्धिवंत लोकांचा सर्वात मोठा लोकशाही देश आहे, असे एस्पर यांनी म्हटले. पुढील महिन्यात भारत, अमेरिका आणि जपान देशांच्या सैन्याचा संयुक्त सराव होणार असल्याचे त्यांनी सांगतिले.
मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिका आणि भारत यांच्या सैन्यामध्ये पहिल्यांदा द्विपक्षीय युद्धसराव झाला होता. दोन्ही देशांसमोरील चीनचे आव्हान यावर चर्चा होणार असल्याचे एस्पर यांनी सांगितले.अमेरिकेचे दोन्ही मंत्री भारत आणि चीन यांच्यातील तणावाची स्थिती वाढली असताना दौऱ्यावर आहेत. चीन आणि भारत यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी चर्चा सुरु आहेत.
संबंधित बातम्या:
Donald Trump | पराभव झाल्यास देश सोडून जावं लागेल, ट्रम्प यांची भावनिक साद
(Foreign and Defence Minister of America will visit India)