नवी दिल्ली : दिवाळी निमित्त दिल्लीतील अमेरिकी दुतावास येथे सुदंर अशा प्रकारे दिवाळी साजरी करण्यात आली. दुतावास येथे ‘दिलबर दिलबर’ गाण्यावर परदेशी तरुणींनी डान्स (US embassy foreigner lady dance) करत जल्लोषात दिवाळी साजरी केली. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल (US embassy foreigner lady dance) होत आहे.
दिल्ली येथे अमेरिकेच्या दुतावास यांचे कार्यालय आहे. या कार्यालयातही दिवाळीनिमित्त सुंदर असं डेकोरेशन करण्यात आलं आहे. तसेच दिवाळी साजरी करण्यासाठी अनेकांना आंमत्रितही करण्यात आले. यावेळी परदेशी तरुणींनी भारतीय संस्कृतीनुसार कपडे परिधान करुन त्यांनीही दिवाळी साजरी केली.
‘लय भारी’ व्हिडीओ : अमेरिकन दूतावासातील कर्मचाऱ्यांची मराठीतून डायलॉगबाजी
विशेष म्हणजे या कार्यक्रमात दिलबर दिलबर या गाण्यावर परदेशी तरुणी थिरकल्या. त्यामुळे उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवत त्यांचे कौतुक केले तसेच त्यांना प्रोत्साहनही दिले. अमेरिकी दुतावास यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
दरम्यान, या दुतावास कार्यालयातर्फे भारतातील प्रत्येक सण साजरे केले जातात. भारताची संस्कृती आणि पंरपरेचे कौतुक या दुतावास कार्यालयात केले जाते.
We are already getting into the #Diwali groove! ✨ Watch our American divas shake a leg together on a hit Bollywood song! ? pic.twitter.com/uZcGOFHa9A
— U.S. Embassy India (@USAndIndia) October 26, 2019