मुंबई : कोरोना महामारीमुळे (Corona Pandemic) नुकसानीत असलेला वाहन उद्योग (Auto Industry) गेल्या दोन-तीन महिन्यांपासून पुन्हा रुळावर येऊ लागला आहे. त्यातही प्रामुख्याने दिवाळीत मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यामुळे अनेक कार कंपन्यांना नवसंजीवनी मिळाली आहे. दिवाळीनंतर आता अनेक कार कंपन्यांनी नाताळ आणि नवीन वर्षानिमित्त विविध ऑफर्स सादर केल्या आहेत.
मर्सिडिज बेंझ (Mercedes-Benz) कंपनीने अमेरिकेत त्यांच्या टॉप सेडानवर जवळपास 7.35 लाख रुपयांची सूट दिली आहे. कोणत्याही कंपनीने दिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर असल्याचं बोललं जात आहे. कंपनीने त्यांची मागील जनरेशन S क्लास (Mercedes-Benz S-Class) क्लियर करत असल्याचा दावा कार्स डायरेक्टच्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. (Forgot Christmas shopping? Mercedes rolls out $10,000 discount on S-Class)
कंपनीची नवीन S क्लास जुन्या S क्लासपेक्षा खूप वेगळी आहे. अशातच जुन्या एस-क्लासवर देण्यात आलेल्या डिस्काऊंटनंतर ही कार खरेदी करणं कोणत्याही श्रीमंत व्यक्तीसाठी खूपच सोपी गोष्ट असणार आहे. परंतु अनेकांना असा प्रश्न पडलाय की, डिस्काऊंटनंतर ही कार खूप स्वस्त मिळेल का? कारण या सेडानची अमेरिकेतील किंमत ही 70 लाख रुपये आहे.
नव्या एस क्लासमध्ये कंपनीने अनेक बदल आणि अपडेट्स केले आहेत. या कारमध्ये काफ मसाज, इलेक्ट्रिक ऑपरेटेड डोर आणि अनेक नवीन फिचर्स देण्यात आले आहेत. या फिचर्समुळे ही कार अधिकच शानदार बणली आहे. या कारमध्ये तुम्हाला 12.8 इंचांची टॅबलेट स्टाईल OLED इन्फोटेन्मेंट स्क्रिन देण्यात आली आहे. तसेच चालकासाठीची स्क्रिन ही 12.3 इंचांची आहे. या स्क्रिन्स 3D डिजिटल इंस्ट्रूमेंट डिस्प्लेसह आहे.
मागच्या बाजूला अजून दोन स्क्रीन्स आहेत, जेणेकरुन मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांचे मनोरंजन होईल. इथे तुम्हाला एक आर्मरेस्ट माऊंटेड टॅबलेट देण्यात आला आहे, जो रियर सीट पॅसेंजर्ससाठी आहे.
हेही वाचा
नवीन कार घेण्याचा विचार करताय? ‘या’ गोष्टी लक्षात घ्या अन्यथा होऊ शकते नुकसान…
टाटा मोटर्सनेही गाड्यांच्या किंमती वाढवल्या, 1 जानेवारीपासून नव्या किंमती लागू
नियम बदलले! चारचाकी गाड्या वापरताय; मग कंपन्यांना हे फीचर्स द्यावेच लागणार
(Forgot Christmas shopping? Mercedes rolls out $10,000 discount on S-Class)