Manohar Joshi : ‘नांदवी ते वर्षा’ … कसा होता महाराष्ट्राच्या सरांचा राजकीय प्रवास

| Updated on: Feb 23, 2024 | 7:25 AM

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे ज्येष्ठे नेते मनोहर जोशी यांचे आज ( शुक्रवार) पहाटे निधन झाले. हिंदुजा रुग्णालयात त्यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 'नांदवी ते वर्षा' .. महाराष्ट्राच्या सरांचा राजकीय प्रवास कसा होता जाणून घेऊया.

Manohar Joshi : नांदवी ते वर्षा ... कसा होता महाराष्ट्राच्या सरांचा राजकीय प्रवास
Follow us on

निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 23 फेब्रुवारी 2024 : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे ज्येष्ठे नेते मनोहर जोशी यांचे आज ( शुक्रवार) पहाटे निधन झाले. हिंदुजा रुग्णालयात त्यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 21 फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिलमध्ये ॲडमिट करण्यात आले होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली.

मनोहर जोशी यांचा अल्पपरिचय : २ डिसेंबर १९३७ साली रायगड जिल्ह्यातील नांदवी या छोट्याशा गावात मनोहर जोशी यांचा जन्म झाला. ध्येयाकडे लक्ष ठेवून त्यांची खडतर सुरुवात झाली. सुसंस्कृत पण गरीब कुटुंबात जन्म झाल्यामुळे ‘कमवा व शिका’ या तंत्राने त्यांनी लहानपणापासूनच संघर्ष केला. वडीलांबरोबर भिक्षुकी करून ते पैसे मिळवू लागले.

त्यांनी चौथीपर्यंत नांदवी येथे तर पाचवीला महाड येथे शिक्षण घेतले. सहावीनंतर शिक्षणासाठी ते पनवेलला मामांकडे गेले. मामांची बदली झाल्यामुळे गोल्फ मैदानात बॉयची नोकरी करून मित्राच्या खोलीत भाड्याने राहिले. अकरावीला शिकण्यासाठी मुंबईला बहिणीकडे राहिले. सहस्त्रबुध्दे क्लासमध्ये शिपायाची नोकरी करून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी किर्ती कॉलेजमधून बी. ए ची पदवी घेतली. मुंबई महानगरपलिकेत क्लार्कची नोकरी केली. वयाच्या 27 व्या त्यांनी वर्षी एम.ए., एल एल. बी. केली. १९६४ साली त्यांनी अनघा जोशी यांच्याशी विवाह केला. त्यांना एक मुलगा व दोन मुली आहेत.

वयाच्या ७२व्या वर्षी ‘शिवसेनेची निर्मिती, वाढ, स्वरूप, यशापयश आणि भारतीय राजकारणातील शिवसेनेचे भवितव्य यांचा विश्लेषणात्मक अभ्यास’ या विषयावर पी एच. डी. पूर्ण केली. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून सन्मानार्थ डी. लिट. हो मानद पदवी मिळाली.

राजकीय जीवन 

आज भारतभर ७० शाखा व दरवर्षी १२ हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिक्षण, कोहिनूर ग्रुप आज शिक्षण क्षेत्राबरोबरच हटिल, हॉस्पिटल, बांधकाम व विकास आणि उर्जा क्षेत्रात महत्त्वाचे कार्य करीत आहे.

समाजकारणाच्या उद्देशाने व शिवसेना प्रमुख मा. श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावामुळे १९६७ पासून शिवसेनेत प्रवेश व राजकारणात सक्रीय सहभाग घेतला. 1995 साली  युतीच्या सत्तेत मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

समाजकारणाच्या उद्देशाने व शिवसेना प्रमुख मा. श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावामुळे १९६७ पासून शिवसेनेत प्रवेश व राजकारणात सक्रीय सहभाग घेतला. ठाकरे कुटुंबाच्या चार पिढ्यांचे काम बघण्याचे भाग्य त्यांना लाभले. प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या चार पिढ्यांचे काम त्यांनी पाहिले.

राजकीय, क्रीडा क्षेत्रात भूषवलेली महत्त्वाची पदे :

अ) राज्य पातळी – १९६८ ते १९९९

नगरसेवक (२ टर्मस्)

विधानपरिषद सदस्य (३ टर्मस)

महापौर, मुंबई महानगरपालिका १९७६-७७

विधानसभा सदस्य (२ टर्मस)

विरोधी पक्ष नेता विधानसभा १९९०-९१

मुख्यमंत्री – महाराष्ट्र राज्य १९९५-९९

ब) राष्ट्रीय पातळी – १९९९ ते २०१२

केंद्रीय मंत्री (अवजड आणि सार्वजनिक उद्योग खाते)

१९९९-२००२

अध्यक्ष लोकसभा (शिवाय अनेक समित्यांच्या

अध्यक्षपदांची जबाबदारी) २००२-२००४ खासदार राज्यसभा (वेगवेगळ्या समित्यांचे सदस्यत्व)

२००६ ते २०१२

क्रीडाक्षेत्र

क्रिकेट हा त्यांचा छंद होता.

अध्यक्ष – मुंबई क्रिकेट असोसिएशन (४ टर्मस्)

उपाध्यक्ष भारतीय क्रिकेट नियामक महामंडळ (बी सी सी आय)

साहित्यक्षेत्र

डॉ. मनोहर जोशी यांनी लिहिलेली पुस्तके – १५

डॉ. मनोहर जोशी यांच्यावर मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये इतर लेखकांनी १७ पुस्तके लिहिली आहेत. ऑडिओ बुक्स १०