नवी दिल्ली: भारताचे विंग कमांडर अभिनंदन यांना भारताकडून हल्ला होण्याच्या भीतीने मुक्त केलं, असा खुलासा स्वत: पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्र्यांनी केला आहे. पाकिस्तानच्या संसदेतच ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी हा खुलासा केला आहे. यावर भारताचे तत्कालीन वायूसेना प्रमुख बी. एस. धनोआ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. “त्यावेळी भारतीय सैन्य खूप अॅग्रेसिव्ह होतं. आम्ही त्यावेळी अशा स्थितीत होतो की पाकिस्तानने जर विंग कमांडर अभिनंदन यांना सोडलं नसतं तर आम्ही त्यांची पूर्ण ब्रिगेड उद्ध्वस्त केली असती. ही बाब पाकिस्तानही जाणून होता”, असं धनोआ म्हणाले. (former Indian air force chief B S Dhanoa on wing commander Abhinandan and Pakistan)
माजी वायूसेना प्रमुख बी. एस. धनोआ यांनी विंग कमांडर अभिनंदन यांच्या वडिलांसोबत काम केलं आहे. अभिनंदनच्या वडिलांना मी वचन दिलं होतं, की आम्ही त्याला परत आणू, असं धनोआ यांनी सांगितलं. 1999 मध्ये पाकिस्ताननं भारताला धोका दिला होता. त्यामुळं आम्ही सुरुवातीपासूनच सतर्क होतो, असंही धनोआ म्हणाले.
‘विंग कमांडर अभिनंदन यांना भारताबद्दल असणाऱ्या भीतीपोटी सोडण्यात आलं. पाकिस्तानी सरकारच्या मनात भारताबद्दल अशी काही भीती होती, की त्यांनी कुठलाही वेळ वाया न घालवता विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना तत्काळ मुक्त केलं आणि भारतासमोर गुडघे टेकले. भारताला खूश करण्यासाठी अभिनंदन यांना सोडण्यात आलं’, अशी कबुलीच पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी पाकिस्तानी संसदेत दिली आहे.
पाकिस्तानमधील खासदार अयाज सादिक यांनी तर पाकिस्तानी सैन्य प्रमुखांची झालेली हालत बोलून दाखवली. “त्यावेळी पाकिस्तानी सरकारच्या मनात भारत हल्ला तर करणार नाही ना, अशी भीती होती. भारताच्या हल्ल्याच्या भीतीनं पाकिस्तानचे तत्कालीन सेनाप्रमुख कमर जावेद बाजवा यांचे पाय कापत होते. त्यांना प्रचंड घाम फुटला होता. बाजवा यांना भारताकडून होणाऱ्या हल्ल्याची मोठी भीती वाटत होती”, अशा शब्दात अयाज सादिक यांनी पाकिस्तानच्या मनातील त्यावेळची भीती बोलून दाखवली.
ढाण्या वाघाची ग्रँड एण्ट्री! विंग कमांडर अभिनंदन पिस्तुलसह मायभूमीत!
वायूदल प्रमुखांसोबत विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पुन्हा भरारी
भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर जैशचा म्होरक्या मसूद अजहरला आानंदाच्या उकळ्या, ऑडिओ टेप जारी
former Indian air force chief B S Dhanoa on wing commander Abhinandan and Pakistan