नवी दिल्ली : कोरोना महामारीमध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांना शिकवले जात (Handicap Students online education) आहे. पण ऑनलाईन शिक्षण पद्धतीत दिव्यांग विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे एका सर्व्हेतून समोर आले आहे. या अडचणींमुळे जवळपास 43 टक्के विद्यार्थी शिक्षण सोडू शकतात, असा दावाही या सर्व्हेतून करण्यात आला (Handicap Students online education) आहे.
हा सर्व्हे दिव्यांगांच्या अधिकारांसाठी काम करणाऱ्या स्वाभिमानी संघटनेकडून करण्यात आला आहे. यामध्ये ओडिसा, झारखंड, मध्य प्रदेश, त्रिपुरा, चेन्नई, सिक्किम, नागालँड, हरियाणा आणि जम्मू-काश्मिर येथील दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
ऑनलाईन शिक्षण पद्धतीत अनेक विद्यार्थ्यांकडे इंटरनेट, वायफाय, कॉम्प्यूटर, टॅब नाही. तसेच वेबिनारमध्ये सर्वजण एकत्र संवाद साधत असल्यानेही काही दृष्टीहीन विद्यार्थ्यांना विषय समजत नाही. अशा प्रकारच्या अनेक अडचणी विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाल्या आहेत. 56.5 टक्के दिव्यांग मुलांना या अडचणींचा सामना करावा लागत आहे, असं या सर्व्हेत म्हटले आहे.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
या सर्व्हेमध्ये विद्यार्थी, शिक्षकांसह 3 हजार 627 लोकांनी सहभाग घेतला. यानुसार 56.5 टक्के दिव्यांग मुलांना या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे. अशा अडचणी असूनही दिव्यांग विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत.
“ऑनलाईन शिक्षणाबद्दल आम्हाला काहीच माहित नाही, त्यामुळे आम्ही ऑनलाईन शिक्षण करु शकत नाही”, असं मत 77 टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले.
“56.48 टक्के दिव्यांग विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेण्यास इच्छुक आहेत, तर 43.52 टक्के दिव्यांग विद्यार्थांनी शिक्षण सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असंही सर्व्हेतून समोर आले आहे. तर 39 टक्के दृष्टीहीन विद्यार्थ्यांना एकत्र संवाद साधत असल्यामुळे विषय समजत नाही”, असं 44 टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले.
“64 टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन आणि कम्प्यूटर नाही. 67 टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले की, त्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी टॅब किंवा कम्प्यूटरची आवश्यकता आहे. तर 74 टक्के मुलांनी सांगितले की, ऑनलाईन शिक्षणासाठी आम्हाला इंटरनेट डाटा, वायफायची गरज आहे. तर 61 टक्के विद्यार्थ्यांनी सहाय्यकची गरज आहे”, असं सांगितले.
संबंधित बातम्या :
ऑनलाईन शिक्षणाचा ‘व्हीस्कूल पॅटर्न’, महाराष्ट्रातील दहावीच्या लाखो विद्यार्थ्यांना मोफत
ऑनलाईन शिक्षण उपक्रम चांगला, मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थी वंचित राहतील : विवेक पंडित