नागपूरमध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून 4 महिला मजुरांचा मृत्यू

| Updated on: Feb 21, 2020 | 11:48 PM

नागपूरमधील अदासा येथे लघु पाटबंधारे विभागाच्या बंधाऱ्याचं बांधकाम सुरु असताना आज (21 फेब्रुवारी) मोठा अपघात झाला.

नागपूरमध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून 4 महिला मजुरांचा मृत्यू
Follow us on

नागपूर : नागपूरमधील अदासा येथे लघु पाटबंधारे विभागाच्या बंधाऱ्याचं बांधकाम सुरु असताना आज (21 फेब्रुवारी) मोठा अपघात झाला (Women labour death in Nagpur). यात 4 महिला मजुरांचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला आहे. कामावर असलेल्या इतर 2 महिला मजूर जखमी आहेत. पोलिसांनी या प्रकरणात कंत्राटदार आणि कामावरील सुपरवायझरविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अदासा येथे पाटबंधारे विभागाच्या छोट्या बंधाऱ्याचं काम सुरु होतं. तेथे शेजारीच एक मातीचा ढिगाराही होता. यावेळी हा ढिगारा कोसळून त्याखाली एकूण 6 महिला मजूर दबल्या गेल्या. यापैकी दोन महिलांना वाजवण्यात यश आलं. मात्र, वेळीच मदत न मिळाल्याने इतर 4 महिलांचा दुर्देवी मृत्यू झाला. सर्व मृत महिला मध्यप्रदेशमधील रहिवासी आहेत.

कामाच्या ठिकाणी ठेकेदार आणि सुपरवायझरने निष्काळजीपणा बाळगल्याचाही आरोप होत आहे. त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. विशेष म्हणजे हा अपघात झाल्यानंतर योग्यवेळी मदत न मिळाल्याने मजूरांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा केल्याचंही बोललं जात आहे. कामाच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेची योग्य ती खबरदारी घेणं अपेक्षित असतानाही ठेकेदारांकडून अशा पद्धतीने काम करवून घेतलं जात असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Women labour death in Nagpur