मुंबई : येमेनमध्ये गेल्या 10 महिन्यांपासून अडकलेल्या 14 भारतीयांची अखेर सुटका करण्यात आली आहे. एडनच्या खाडीमध्ये जहाज दुर्घटनेनंतर फेब्रुवारी 2020 पासून 14 भारतीय येमेनमध्ये अडकले होते. हे सर्व भारतीय नागरिक शनिवारी दुबईहून मुंबईत पोहोचले. यामध्ये 6 मराठी तरुणांचा समावेश आहे. फेब्रुवारी महिन्यापासून येमेनमधील कैदत अडकलेल्या एकूण 20 जहाज कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे. यामध्ये 14 भारतीय 5 बांगलादेशी आणि एका इजिप्शियन नागरिकाचा समावेश आहे. हे सर्व 14 भारतीय शनिवारी दुबईहून मुंबईला परतले आहेत. या सर्वांच्या सुटकेसाठी दुबईस्थित उद्योजक धनंजय दातार यांनीही विशेष प्रयत्न केले. (fourteen Indian citizens return to India from Yemen)
भारतीय उच्चायुक्त कार्यालय आणि जिबूतीच्या प्रयत्नांमुळे 14 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली. उच्चायुक्त कार्यालायानं दिलेल्या माहितीनुसार भारतीय नागरिकांनी त्यांच्याकडील पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे हरवली होती. त्यामुळे त्यांनी भारतीय उच्चायुक्त कार्यालयाकडे मदत मागितली होती.
येमेनमधून सुटका करण्यात आलेल्या नागरिकांमध्ये संदीप लोहार, नीलेश लोहार, अहमद अब्दुल गफूर वाकणकर, फिरोज झारी, तन्मय राजेंद्र माने, दाऊद जोवारक या मराठी युवकांचा समावेश आहे. हिरोन एसके, चेतन हरि चंद्र गावस, मोहनराज थानीगचलम व विल्लीयम निकामदे, मरियप्पन, प्रवीण थम्मकरांतविडा आणि अब्दुल वहाब मुस्तब हे देखील भारतात परतले आहेत. (fourteen Indian citizens return to India from Yemen)
अल अदिल ट्रेडिंग कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय दातार यांनी गरजूंना केलेल्या मदतीचा अनुभव पुन्हा एकदा सर्वांना आला आहे. डॉ. दातार यांनी गेल्याच महिन्यात सौदी अरेबियात तुरुंगवासात अडकलेल्या 700 भारतीय कामगारांना सुखरूप सुटका केली होती.. त्याच्या या मदतीमुळे येमेनमधील कर्मचाऱ्यांनी डॉ.धनंजय दातार यांचे आभार मानलेयेत. आणखी काही भारतीय परदेशात अडकले असल्यास, आम्हाला कळवावं, त्यांनाही मदत करू, असं डॉ. दातार यांनी सांगितलंय. डॉ. धनंजय दातार यांनी या भारतीय जहाज कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात 20-20हजार रुपयेही जमा केले आहेत. (fourteen Indian citizens return to India from Yemen)
खाडी महाराष्ट्र व्यापार मंच (GMBF) चे चंद्रशेखर भाटिया यांनी भारतीय नागरिक दुबईहून मुंबईला परतल्याचे सांगितले. भाटिया यांनी जीएमबीएफचे अध्यक्ष सुनील मांजेरकर यांच्यावतीनं केंद्र सरकार आणि अधिकाऱ्यांचे आभार मानले.
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 6 December 2020https://t.co/9ulosEdOQz
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 6, 2020
संबंधित बातम्या :