सावधान, पाकिस्तानातील ‘या’ नंबरवरुन आलेला WhatsApp कॉल उचलू नका

| Updated on: Jun 25, 2019 | 12:36 PM

पाकिस्तानकडून सीमेवर शस्त्रसंधी उल्लंघन होत असताना आता देशांतर्गत आर्थिक फसवणुकीचे प्रयत्नही होत असल्याचे समोर येत आहे.

सावधान, पाकिस्तानातील या नंबरवरुन आलेला WhatsApp कॉल उचलू नका
Follow us on

नवी दिल्ली: पाकिस्तानकडून सीमेवर शस्त्रसंधी उल्लंघन होत असताना आता देशांतर्गत आर्थिक फसवणुकीचे प्रयत्नही होत असल्याचे समोर येत आहे. मागील काही दिवसांपासून पाकिस्तानमधून काही WhatsApp कॉल येत आहेत. त्यात आपण ‘कौन बनेगा करोडपती’कडून बोलत असल्याचा दावाही केला जातो.

देशात अनेकांना ‘923055216117 या क्रमांकावरुन WhatsApp कॉल येत आहेत. मात्र, 92 हा पाकिस्तानचा कोड आहे. फोन करणारी व्यक्ती 25 लाख रुपये जिंकल्याचे आमिष दाखवते. या व्यक्तीचा प्रोफाईल फोटोला ‘कौन बनेगा करोडपती’चा लोगो लावलेला दिसतो. यावेळी समोरची व्यक्ती 25 लाख रुपये मिळवण्यासाठी माझा मोबाईल क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करा, असे सांगते. तसेच WhatsApp वर कौन बनेगा करोडपतीचा एक व्हिडीओ देखील पाठवला जातो.

सायबर तज्ज्ञांनी हे WhatsApp कॉल आर्थिक फसवणुकीसाठी केले जात असल्याचे सांगितले आहे. असा कॉल आल्यास तो क्रमांक ब्लॉक करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. अन्यथा मोठी आर्थिक फसवणूक होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. जर अशा कोणत्याही क्रमांकावरुन मिस कॉल आलेला असला, तर त्यावरही पुन्हा कॉल करु नका, अशी सुचना सायबर तज्ज्ञांनी दिली.