नागपूर : बनावट चेक देऊन सराफा व्यापाऱ्यांना ठगणाऱ्या ठगबाजला (Fraudster Arrested Who Fraud Jwellers) नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. अनेक सराफा व्यापाऱ्यांना यांनी गंडविलं असल्याचं पोलीस तपासात पुढे आलं आहे. त्याच्याकडून 16 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे (Fraudster Arrested Who Fraud Jwellers).
कधी डॉक्टर तर कधी प्राध्यापक असल्याचं सांगून ठगी करणारा आशुतोष महाजन याने आतापर्यंत अनेक सराफा व्यापाऱ्यांना गंडा घातला आहे. आपली प्रतिष्ठा दाखवून हा सराफ व्यापऱ्याकडे जायचा त्यांना सोन खरेदी करायचं म्हणून सांगायचं आणि त्यांना चेक द्यायचा.
दिलेला चेक हा बनावट असल्याची अशीच एक तक्रार नागपूरच्या तहसील पोलिसांकडे आली. त्यांनी तपास सुरु केला असता त्याचे वेगवेगळे पत्ते मिळून आले. तो राहणारा चंद्रपूर जिल्ह्यातील वणीचा आहे. त्या ठिकाणी सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल असून तो तिथून फरार आहे (Fraudster Arrested Who Fraud Jwellers).
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
नागपुरात त्याचा पत्ता पोलिसांना मिळाला आणि त्यांनी याला अटक केली असता त्याचे अनेक गुन्हे उघड झाले. त्याच्या घरातून अनेक बनावट चेक, स्टॅम्प सुद्धा मिळून आले. सोबतच 16 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल सुद्धा त्याच्या कडून जप्त करण्यात आला आहे. आता अनेक सराफा व्यापारी पुढे यायला सुरुवात झाली असून याचे आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
हुशार चोरांनी 100 किलोची तिजोरी तलावात लपवली, तरबेज पोलिसांनी चुटकीसरशी पकडलंhttps://t.co/uWVpECjqug#Kandivali #VaultThief #WineBar
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 18, 2020
Fraudster Arrested Who Fraud Jwellers
संबंधित बातम्या :
धुळ्यात ‘स्पेशल 26’, भुजबळांच्या नावावर रेशन दुकानदाराकडून दोन लाखांच्या खंडणीची मागणी
‘लंडनच्या जावया’ने मुंबईकर कुटुंबाला लुबाडले, लग्न जुळवून 7.89 लाखांना गंडा