पुणे : कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 12 वर (Pune corona cases) पोहोचला आहे. पुण्यात आणखी एक नवा रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने, पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 9 वर पोहोचला आहे. याआधी पुण्यातील 8, मुंबईतील 2 आणि नागपुरातील 1 अशा 11 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामध्ये आता पुण्यातीलच एकाची भर पडली आहे.
पुण्यात एकूण 09 रुग्ण
महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 12 वर पोहोचली आहे (Number of Corona Patient in Maharashtra). सर्वात आधी पुण्यातील दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली होती. दुबईहून आलेले पुण्यातील दाम्पत्य, त्यांची मुलगी आणि नातेवाईकाला कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय हे दाम्पत्य मुंबईहून पुण्याला ज्या टॅक्सीने गेले, त्या टॅक्सीचालकालाही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर 11 तारखेला आणखी 3 सहप्रवाशांची भर पडली. यानंतर आता 12 तारखेला आणखी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे एकट्या पुण्यात कोरोनाचे 9 रुग्ण आढळले आहेत.
प्रकृती स्थिर
पुणे शहरामध्ये कोरोनाचे एकूण 9 रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. अमेरिकेहून 1 मार्च रोजी पुण्यातील नागरिक परत आला होता. त्याची तपासणी 11 मार्च रोजी करण्यात आली, ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 9 वर गेली आहे. या रुग्णांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
नागपुरात एक रुग्ण आढळला
कोरोनाची लागण झालेले मुंबईत (Nagpur Corona Patients) दोन आणि पुण्यात आठ रुग्ण सापडले असतानाच, नागपुरातही एक कोरोनाबाधित रुग्ण सापडला आहे. अमेरिकेहून पाच दिवसांपूर्वी नागपुरात आलेल्या एका व्यक्तीला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पाच दिवसांपूर्वी ही व्यक्ती अमेरिकेतून आली. या व्यक्तीच्या अहवालानुसार, त्याला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले.
हेही वाचा : खोकायचं कसं, शिंकायचं कसं? हात स्वच्छ धुणे म्हणजे नेमकं काय? पुणे विभागीय आयुक्तांच्या सोप्या टिप्स
महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?
महाराष्ट्रात कोरोनाचा एकही रुग्ण अत्यवस्थ नाही : राजेश टोपे
कोरोनाबाबत जास्त काळजी करु नये. मात्र सतर्कता बाळगावी. आपली रोगप्रतिकार क्षमता चांगली झाली तर आपोआप या आजारातून सुटका होते. या आजारातील मृत्यूदर 2.5 टक्के आहे. या आजाराचे अद्याप एकही रुग्ण महाराष्ट्रात क्रिटिकल नाही. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. शाळांच्या बाबतीतही चर्चा झाली. याबाबच सर्व तज्ज्ञांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यामध्ये हिंदूजा, जसलोक, लिलावती अशा विविध रुग्णालयाचे तज्ज्ञ होते. शाळांना तूर्तास सुट्टी देण्याची गरज नाही. त्याने भीतीचे वातावरण वाढेल. त्यामुळे तूर्तास कोणत्याही शाळेला सुट्टी दिली जाणार नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
संबंधित बातम्या
Corona | नागपुरातही कोरोनाबाधित रुग्ण आढळला, राज्यातील संख्या 11 वर
कोरोनाची मुंबईत एन्ट्री, महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 7 वर