Gadchiroli Flood गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात पावसाने हाहाकार (Gadchiroli Flood) माजवला आहे. भामरागड (Bhamragad Flood), अहेरी, सिरोंचा, मुलचेरा, एटापल्ली धानोरा चार्मोशी या सात तालुक्यातील अनेक भागाचा संपर्क तुटला आहे. भामरागड तालुक्यातील शंभर गावांचा संपर्क तुटला असून तीन दिवसापासून पर्लाकोटा पुलावरुन पाणी वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे बंद आहे. पर्लकोटा,वैनगंगा,दिना, प्राणहिता, इंद्रवती, गोदावरी, या सहा नद्यांना मोठया प्रमाणात पूर आलेला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यात सर्व शाळांना आज आणि उघा सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नदी नाले ओलांडून नये असे निदर्शने देण्यात आले आहेत.
वैनगंगा नदीला पूर आल्याने आष्टी पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे चंद्रपूर-आष्टी- आलापल्ली मार्ग बंद झाला. भामरागड, अहेरी, सिरोंचा, मुलचेरा, एटापल्ली या पाच तालुक्यातील अनेक भागाचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील 12 तालुक्यात धुवाँधार पाऊस बरसत आहे.
पावसामुळे कोणकोणते मार्ग बंद?
आलापल्ली – भामरागड मार्ग बंद
बडीया मार्ग बंद
कुरखेडा-वैरागड मार्ग बंद
आरमोरी -वडसा मार्ग बंद
कमलापुर-रेपलपल्ली मार्ग बंद
अहेरी- देवालमरी नाल्याने मार्ग बंद
आलापल्ली- सिरोंचा मार्ग बंद
छिमेला नाल्यावर मोठया प्रमाणात पाणी वाहत असल्याने दोन तासापासून वाहतूक ठप्प. छिमेला नाल्यात मागील वर्षी एस.टी.बस वाहून गेली होती.