गडचिरोलीत नक्षल चकमकीत पीएसआयसह एक शिपाई शहीद, 3 जवान जखमी

| Updated on: May 17, 2020 | 6:30 PM

नक्षलवाद्यांनी लावलेल्या अॅम्बूशमध्ये आज पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमने आणि शिपाई किशोर आत्राम हे शहीद झाले आहेत.

गडचिरोलीत नक्षल चकमकीत पीएसआयसह एक शिपाई शहीद, 3 जवान जखमी
Follow us on

गडचिरोली : नक्षलवाद्यांनी लावलेल्या अॅम्बूशमध्ये आज पोलीस उपनिरीक्षक (Gadchiroli Naxal Attack Martyr) धनाजी होनमने आणि शिपाई किशोर आत्राम हे शहीद झाले आहेत. भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस ठाण्यांतर्गत आलदंडी-गुंडुरवाही गावा जवळच्या जंगलात आज (17 मे) सकाळी 6 ते साडे सहा दरम्यान ही चकमक झाली. या चकमकीत तीन जवान जखमी झाले असून, एकाची प्रकृती (Gadchiroli Naxal Attack Martyr) गंभीर आहे.

आज (17 मे) पहाटे 5 वाजताच्या सुमारास शीघ्र कृती दल आणि सी-60 पथकाचे जवान आलदंडी-गुंडुरवाही जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवत असताना नक्षल्यांनी प्रथम भूसुरुंगस्फोट घडवून गोळीबार केला. पोलिसांनीही गोळीबाराला प्रत्युत्तर देत गोळाबार केला. मात्र, यात पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमने आणि शिपाई किशोर आत्राम हे शहीद झाले. तर गोंगलू ओक्सा, राजू पुसली आणि दसरु कुरचामी हे जवान जखमी झाले. दसरु कुरचामी या जवानाची प्रकृती गंभीर आहे.

शहीद जवानांचे पार्थिव आज दुपारी दोन वाजता हेलिकॉप्टरने गडचिरोली येथे आणण्यात आले. तर जखमी जवानांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. अजूनही घटनास्थळावर ऑपरेशन सुरु आहे.

शहीद धनाजी होनमने हे पंढरपूर जिल्ह्यातील पुलूज येथील मूळ रहिवासी असल्याची माहिती आहे. ते साडेतीन वर्षांपासून भामरागड येथील शीघ्र कृती दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. शहीद किशोर आत्राम हे भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथील रहिवासी आहेत.

2 मे रोजी एटापल्ली तालुक्यातील सिनभट्टी येथील जंगलात झालेल्या चकमकीत पोलिसांनी जहाल नक्षली आणि कसनसूर दलमच्या विभागीय समितीची सदस्य सृजनक्का हिला कंठस्नान घातले होते. तिच्या हत्येचा निषेध म्हणून नक्षल्यांनी ठिकठिकाणी पोस्टर्स लावून 20 मे रोजी जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर नक्षल्यांनी हिंसक कारवाया करणे सुरु केले आहे. त्या पाश्वभुमीवर आज गडचिरोली पोलिसांकडून नक्षल विरोधी ऑपरेशन राबविण्यास तीन तुकड्या निघाल्या होत्या. भामरागड तालुका छत्तीसगड राज्याची सिमेला लागून असल्याने मोठ्या (Gadchiroli Naxal Attack Martyr) संख्येत नक्षलवादी महाराष्ट्रात प्रवेश केला.

संबंधित बातम्या :

कोरोनाग्रस्ताला हॉस्पिटलच्या बसने वाटेतच सोडले, दुसऱ्या दिवशी आढळला मृतदेह

Ratnagiri Corona | मुंबईहून आलेल्या चौघांना ‘कोरोना’, रत्नागिरीत कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?

रेशनकार्डचा रंग बघून उपचार देणार का? मनसे आमदार राजू पाटील यांचा सरकारला सवाल

महाराष्ट्रात कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत वाढ, दोन दिवसात 145 जणांना लागण