रत्नागिरी : कोकणातला गणेशोत्सव परंपरा आणि संस्कृतीसाठी ओळखला जातो. यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. पण असे असले तरीही कोकणात गणपतीचा उत्साह शिगेला पोहचला आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलीस प्रशासनाने काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. त्या गाईडलाईन्स पाळूनच कोकणवासियांना गणपती बाप्पाचे आगमन आणि विसर्जन करावे लागणार आहे. (Konkan Ganeshotsav Guidelines)
कोकणात अनेक गावात गणपती हे डोक्यावरुन आणण्याची परंपरा असून गावातील सर्व घरगुती गणपती एकत्र आणले जातात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे. त्यामुळे यंदा गणपती आगमनादरम्यान गर्दी करु नका, असे आवाहन रत्नागिरीचे पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे यांनी केले आहे.
#ratnagiri #GaneshChaturthi2020
श्री गणेश आगमन उद्या होत आहे. कोकणात असणारा हा सर्वात मोठा उत्सव. गणरायाच्या आगमनाबाबत मार्गदर्शक सूचना. @MahaDGIPR @InfoDivKonkan @DMRatnagiri @RatnagiriPolice pic.twitter.com/LEzK0biRPl— DISTRICT INFORMATION OFFICE, RATNAGIRI (@InfoRatnagiri) August 21, 2020
गणपतीच्या आगमनासाठी गर्दी करु नका, एकमेकांच्या घरी जाणे, आरती करणे या गोष्टी टाळाव्यात. कोणतीही आगमन अथवा विसर्जन मिरवणुका काढू नयेत, असे आवाहन प्रविण मुंढे यांनी केले आहे. पोलिसांवर कायद्याचा बडगा उगारण्याची वेळ येऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घ्या, असेही मुंढे म्हणाले.
त्याशिवाय यंदा गणपती विसर्जनावेळी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून मूर्तीचे संकलन केले जाणार आहे. विसर्जनासाठी प्रशासनाकडून पेंडॉलही उभे केले जाणार आहेत. तसेच विसर्जनाच्या ठिकाणी आरती करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
येणाऱ्गा यणेशोत्सवाबद्दल मार्गदर्शक सूचना#GaneshUtsav #2020 pic.twitter.com/asgAUTkZQH
— Ratnagiri Police- सद्रक्षणाय खलनिग्रहणाय (@RatnagiriPolice) August 18, 2020
गणेशोत्सव काळात गर्दीची शक्यता असल्याने कोरोना संसर्गाचाही धोका आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंगसह कोरोना नियमावलीचे पालन, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन करणारा एक व्हिडीओही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी पोस्ट केला आहे. (Konkan Ganeshotsav Guidelines)
संबंधित बातम्या :
Pune Ganeshotsav 2020 | पुण्यात गणेश मंडळांसाठी कोणते नियम? गणेशोत्सवासंदर्भात नियमावली जारी
Kokan Ganeshotsav | गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन, उद्यापासून तब्बल 162 रेल्वे धावणार