नवी दिल्ली : चीन आणि पाकिस्तान यांनी अभद्र युती करत कराची हल्ल्यासाठी भारताला जबाबदार ठरवण्याचा बनाव रचला. मात्र ‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे’त जर्मनी आणि अमेरिकेची साथ लाभल्याने भारताने शत्रूराष्ट्रांचा कट तर उधळलाच, मात्र त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर तोंडघशीही पाडलं. (Germany US lends support in India vs China in UNSC over Karachi attack statement)
‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद’ (यूएनएससी) ने 1 जुलै रोजी निवेदन जारी करत पाकिस्तानातील ‘कराची स्टॉक एक्सचेंज’वर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. या हल्ल्यात सुरक्षा रक्षकांसह 10 जणांचा मृत्यू झाला. अशा हल्ल्यांचा निषेध करणारे प्रस्ताव पारित करण्याची यूएनएससीची परंपरा आहे.
चीनने मंगळवारी पाकिस्तानच्या वतीने या हल्ल्याबाबत निवेदन प्रस्तावित केले. प्रस्तावात, या हल्ल्याला भारत जबाबदार असल्याचा खोटानाटा आरोप करण्यात आला. खरं तर या हल्ल्याचा भारताशी दूरदूरपर्यंत काही संबंध नाही. केवळ पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या दहशतवादी हल्ल्यासाठी पाकिस्तानी संसदेत भारतावर खापर फोडले होते.
हेही वाचा : भारत संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य, 184 देशांचा पाठिंबा, पाकिस्तानचा तीळपापड
गोंधळाच्या वातावरणात हे निवेदन देण्याची मुदत दोनदा वाढवावी लागली. चीन आणि पाकिस्तानच्या हातमिळवणीवर जर्मनीने सर्वप्रथम आक्षेप घेतला. यानंतर अमेरिकेनेही आपला निषेध नोंदवला. अखेर फक्त निषेध प्रस्ताव जारी करण्यात आला.
आता जो प्रस्ताव पारित करण्यात आला आहे, त्यामध्ये केवळ कराचीमधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला आहे. भारत किंवा इतर कोणत्याही देशावर याचा ठपका ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे चीन आणि पाकिस्तानने अभद्र युती करत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर रचलेला कट पुन्हा एकदा उधळला गेला.
#UNSC condemned in strongest terms the heinous & cowardly terrorist attack in Karachi, Pakistan on 29.06., which resulted in several ppl killed. They expressed their deepest sympathy & condolences to the families of the victims & to ??Gov’t.
➡️Full Stmnt: https://t.co/UZjemwFG06 pic.twitter.com/cM2mVwUd5D
— German Mission to UN (@GermanyUN) July 1, 2020
(Germany US lends support in India vs China in UNSC over Karachi attack statement)