कॅलिफोर्निया : अमेरिकन अभिनेत्री नाया रिवेरा हिचा मृतदेह तलावात सापडल्याने चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलासोबत बोटिंग करण्यासाठी गेलेली 33 वर्षीय नाया गेल्या आठवड्यापासून बेपत्ता होती. बुडणाऱ्या मुलाचा जीव वाचवताना नाया हिला स्वतःचा प्राण गमवावा लागल्याचे म्हटले जाते. (Glee Actress Naya Rivera Body Found in Piru Lake Dies of Drowning)
कॅलिफोर्नियातील ‘लेक पिरु’ या तलावामध्ये सोमवारी अभिनेत्री नाया रिवेराचा मृतदेह अमेरिकन अधिकाऱ्यांना सापडला. गेल्या आठवड्यात ती आपल्या चार वर्षाच्या मुलासह तिथे बोटिंग करण्यासाठी गेली होती.
“प्राथमिक तपासणीत घातपात किंवा आत्महत्येचा कोणताही पुरावा सापडला नाही” असे वेंचुरा काउंटीचे शेरीफ बिल अयूब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जागा, कपडे आणि मृतदेहाची स्थिती पाहता तो नाया रिवेराचाच आहे, अशी खात्री पोलिसांनी व्यक्त केली.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
लॉस एंजेलसपासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या लेक पिरुमध्ये नाया आणि तिचा मुलगा कॅम्पिंगसाठी गेले होते. भाड्यावर घेतलेली बोट अपघाताने उलटून नाया बुडाल्याचा अंदाज आहे.
We are deeply saddened to learn of the tragic passing of the young & bright “Glee” star & NYFA Alum, Naya Rivera. All of us here at NYFA send their love to her family and her young son.
Rest in peace, Naya ?️ You will be forever missed. pic.twitter.com/wmF47cqso5
— New York Film Academy (@NYFA) July 14, 2020
गेल्या बुधवारी दुपारी ती बेपत्ता झाली होती. तिच्या चार वर्षांच्या मुलाला तलावाकाठी बोटीत एकट्याने झोपल्याचे पाहिल्यावर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर जलतरणपटू, पेट्रोलिंग बोटी आणि हेलिकॉप्टर्सच्या सहाय्याने सहा दिवस मोठी शोधमोहीम राबवण्यात आली.
“ती पाण्याखाली नाहीशी झाली…”
“आईने आधी मला बोटीत बसण्यास मदत केली होती. मात्र मागे वळून पाहिले तेव्हा ती पाण्याखाली नाहीशी झाली” असे मुलाने नंतर तपासकर्त्यांना सांगितले होते. तीव्र लाटांमुळे अपघात घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
हेही वाचा : “मी मृत्यूशय्येवर” इन्स्टाग्राम पोस्टनंतर काही तासात बॉलिवूड अभिनेत्री दिव्या चौकसेचे निधन
“ग्ली” या सीरीजमधील हायस्कूल चीअरलीडर सॅन्टाना लोपेझ या भूमिकेसाठी नाया रिवेरा सर्वाधिक ओळखली जात होती. तिने सहाही सिझनमध्ये ही व्यक्तिरेखा साकारली होती.
“What I love more than acting is being Josey’s mom. So I wanna be there for him and I don’t want to miss anything.”
— 1987-2020, Naya Rivera#RIPNayaRivera pic.twitter.com/nIu4cBalFp— Lost In History (@historyandfacts) July 14, 2020
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ‘ग्ली’मधील कलाकार याआधी अशाच प्रकारे दुर्घटनांना सामोरे गेले आहेत. 2018 मध्ये चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी शिक्षेच्या आठवडाभर आधी अभिनेता मार्क सेलिंगने आत्महत्या केली होती.
जुलै 2013 मध्ये ड्रग्स आणि अल्कोहोलच्या अतिसेवनामुळे कॅनेडियन अभिनेता कोरी माँटेथ याचे निधन झाले होते. योगायोग म्हणजे ज्या दिवशी कोरीचा मृत्यू झाला, त्याच दिवशी नायाचा मृतदेह सापडल्याने चाहते त्याचा ‘दैवी संबंध’ जोडत आहेत. (Glee Actress Naya Rivera Body Found in Piru Lake Dies of Drowning)