मुंबई : बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ अर्थात अभिनेत्री कंगना रनौतने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला होता. यात तिने करण जोहरच्या (Karan Johar) धर्मा प्रोडक्शनवर टीका केली होती. करण जोहरच्या टीम मेंबर्सनी गोव्यातल्या चित्रीकरणाच्या ठिकाणी कचरा टाकल्याचे तिने निदर्शनास आणून दिले होते. त्याच बरोबर तिने चित्रपटसृष्टीमुळे पर्यावरणाला नुकसान होत असल्याचे म्हटले आहे. यानंतर गोव्याचे मंत्री मायकल लोबो (Michael Lobo) यांनी ‘स्वतःचा कचरा इथे न टाकता, स्वतःसोबत न्यावा’, असे म्हणत करण जोहरला सज्जड दम भरला आहे. (Goa waste management minister Michael Lobo angry on karan johar)
गोव्याचे वेस्ट मॅनेजमेंट मंत्री मायकल लोबो यांनी प्रकरणात लक्ष घालत कारवाईचे आदेश दिले आहे. या संदर्भात बोलताना मायकल लोबो म्हणाले की, ‘सदर प्रकार अतिशय चुकीचा आहे. धर्मा प्रोडक्शनच्या मालकाने या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. त्याचबरोबर गोव्यातील लोकांची माफी मागावी. ही जाहीर माफी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मागितली पाहिजे. जर त्यांनी तसे केले नाही तर, आम्ही त्यांना दंड भरण्यास सांगू.’ याशिवाय लवकरच त्यांना या संदर्भात नोटीस पाठवण्यात येईल, असे देखील त्यांनी सांगितले आहे.
Dharma Productions will get a notice for a fine from the Goa Waste Management office. Goa is a beautiful state & people come here for shooting films. Everyone is welcome to come & shoot but take your trash away & don’t leave it here: Michael Lobo, Goa Waste Management Minister pic.twitter.com/78y7By7cqc
— ANI (@ANI) October 28, 2020
‘गोवा हे अतिशय सुंदर राज्य आहे. गोव्यात चित्रीकरणासाठी येणाऱ्या सगळ्यांचेच स्वागत आहे. परंतु इथून जाताना प्रत्येकाने आपला कचरा सोबत न्यावा, इथल्या परिसरात टाकू नये. हे कृत्य अतिशय निंदनीय आहे’, अशा शब्दांत त्यांनी आपला रोष व्यक्त केला आहे. (Goa waste management minister Michael Lobo angry on karan johar)
Karan Johar | गोव्याच्या सौंदर्याचे नुकसान केल्याचा आरोप; करण जोहरच्या टीमवर कंगना रनौत संतापली
करण जोहर आणि धर्मा प्रोडक्शन ही कंपनी सध्या नेहमीच काही ना काही वादात सापडत आहे. गोव्यातील नेरुळ या छोट्याशा गावात करण जोहरच्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. या चित्रीकरणानंतर त्याठिकाणी प्लास्टिकच्या काही प्लेट, चमचे आणि इतर प्लास्टिक कचरा आणि वापरलेल्या पीपीई किट गावातील परिसरात फेकून देण्यात आल्या होत्या. हे गाव गोव्याची राजधानी पणजीपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. गावात टाकण्यात आलेल्या कचऱ्यामुळे येथील रहिवाश्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे.
आता या वादात अभिनेत्री कंगना रनौतनेही उडी घेतली असून, चित्रपटसृष्टीचा पर्यावरणाला धोका असल्याचे कंगना रनौतने म्हटले आहे. शकुन बत्रा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटात दीपिका पादुकोण, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी काम करत आहेत.
(Goa waste management minister Michael Lobo angry on karan johar)