वॉश्गिंटन : आतापर्यंत तुम्ही अनेक निवडणुका पाहिल्या असतील. त्यासोबत वेगवेगळे उमेदवारही पाहिले (Goat and Dog Standing in Mayor Election) असतील. पण कधी निवडणूक रिंगणात उमेदवार म्हणून कुत्रा आणि बकरी पाहिली का? नाही ना, पण अमेरिकेतील वार्मोंट शहरात महापौर पदाच्या निवडणुकीसाठी थेट बकरी आणि कुत्रा या दोघांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. सोशल मीडियावर या दोघांची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.
अमेरिकेतील वर्मोंट शहरात महापौरपदाच्या निवडणुकीत थेट एक कुत्रा आणि बकरीने उतरल्याने संपूर्ण शहरात या दोघांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये लिंकन नावाची बकरी आणि सॅमी नावाचा कुत्रा निवडणूक रिंगणात उतरला आहे. या दोघांमध्ये कोण जिंकेल याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
वर्मोंटमध्ये लिंकन नावाची बकरीची लढत सॅमी नावाच्या जर्मन शेफर्ड कुत्र्यासोबत होत आहे. सॅमीला पोलिसांकडून उमेदवारी देण्यात आली आहे. सॅमी शहरातील एक प्रसिद्ध कुत्रा असल्याचे बोललं जात आहे.
यापूर्वीही एका निवडणुकीत बकरीने विजय मिळवला होता. न्यूबिन असं त्या बकरीचं नाव होते. निवडणुकीत विजय मिळवत बकरीने महापौर पदावर कब्जा मिळवला होता.
अमेरिकेत कुत्रा आणि बकरी निवडणूक का लढवत आहेत?
अमेरिकेतील शहरात पाळीव प्राण्यांसाठी महापौर पदाची निवडणूक म्हणजे लहान मुलांसाठी प्ले ग्राऊंड तयार करणे असते. या निवडणुकीत जो फंड मिळतो. त्याच्या मदतीने प्ले ग्राऊंड तयार केला जातो. याशिवाय काही पैसे लहान मुलांच्या पुनर्वाससाठीही खर्च केले जातात.
निवडणुकीची तारीख 3 मार्च आहे. मतदान करण्यासाठी 1 डॉलर द्यावे लागणार. खेळाच्या मैदानासाठी पैसे जमा करण्यासाठी GoFundMe पेज तयार केले जाते. शहरात खेळाचे मैदान तयार करण्यासाठी 80 हजार डॉलरची गरज आहे. आतापर्यंत 10 हजार डॉलर जमा झाले आहेत.
Goat to face new challenger, dog, in race for mayor of Vermont town. https://t.co/m8rHF0FqZ7
— NBC News (@NBCNews) January 28, 2020