कल्याण : आठ वर्षांपूर्वी चोरीला गेलेले दागिने कल्याण पोलिसांनी संबंधित कुटुंबाला परत मिळवून दिले आहेत. त्यामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या त्या कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे. यामुळे घाग कुटुंबाने कल्याण पोलिसांचे आभार मानले आहेत. (Gold Jewelry stolen 8 years ago has been recovered by police)
दिवा येथे राहणारा संदीप घाग हा तरुण 2012 मध्ये कामानिमित्ताने कल्याणला आला होता. तो रेल्वे ट्रॅकवरुन चालत जात असताना काही चोरट्याने त्याला हटकले. त्याच्या जवळील असलेल्या दागिने घेऊन चोरटे पसार झाले. यानंतर काही वर्षांनी पोलिसांनी संदीपला लुटणाऱ्या चोरट्यांना अटक केली.
त्या चोरट्याकडून संदीपकडून गेलेले दागिने हस्तगत केले. मात्र आता लॉकडाऊनमुळे संदीप घाग यांची नोकरी गेली. त्यात त्यांची आई आजारी आहे. त्यामुळे घराची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. या परिस्थितीत त्यांच्याकडे पैसे नाही.
मात्र याच दरम्यान संदीपला कल्याण जीआरपी पोलिसांनी फोन केला. त्यावेळी पोलिसांनी संदीपला तुमचे दागिने सापडले आहे. तुम्ही घेऊन जा, असे सांगितले. हे सर्व ऐकून संदीपला आश्चर्य वाटले. ज्या घटनेला आठ वर्ष उलटून गेले आहेत. त्यामुळे ही बातमी ऐकून त्याला धक्का बसला.
कल्याण जीआरपीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिक शार्दुल यांनी लवकरात लवकर संदीपचे दागिने त्यांच्या सुपूर्द केले पाहिजे अशी सूचना संबंधित पोलीस अधिकारी रवींद्र आव्हाड यांना केली.
संदीप घागने तातडीने पोलिसात भेट दिली. त्यानंतर कल्याण पोलिसांनी 70 हजार रुपये किंमतीचे दागिने त्याला परत केले. कोरोना काळात पैसे नाही त्याच्यासाठी हा मोठा आधार मिळाला आहे. त्यामुळे संदीप घाग यांनी मनापासून पोलिसांचे आभार मानले आहेत. (Gold Jewelry stolen 8 years ago has been recovered by police)
संबंधित बातम्या :
पत्नीवर वाईट नजर, अश्लील संवाद, वर्ध्यात पतीकडून मित्राची दगडाने ठेचून हत्या