Gold Price Update : मुंबई : सराफा बाजारात गेल्या पाच दिवसात मोठी तेजी (Gold Price Today) पाहायला मिळत आहे. गेल्या पाच दिवसात सोन्याचा भाव तब्बल सोडतीन हजाराने वधारला आहे. सोन्याने आज मागील सर्व रेकॉर्ड मोडत सराफा बाजारात 56 हजार 191 रुपये प्रतितोळा इतका उचांक गाठला. तर चांदीचे भावही गगनाला भिडले आहेत. आज चांदीचा भाव 73 हजार प्रतिकिलोवर पोहोचला आहे (Gold Price Today).
गेल्या पाच दिवसात सोन्याचा भाव साडेतीन हजाराने वधारला
गेल्या पाच दिवसात सोन्याच्या भावात साडेतीन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. 3 ऑगस्टला सोन्याचा भाव 53 हजार 717 रुपये प्रतितोळा होता. 4 ऑगस्टला सोन्याचा भाव वाढून 54 हजार 551 रुपये प्रतितोळ्यावर पोहोचला. तर, 5 ऑगस्टला सोन्याचा भाव 55 हजार 098 रुपये प्रतितोळा होता. 6 ऑगस्टला सोन्याचा भाव 55 हजार 845 रुपये प्रतितोळ्यावर पोहोचला. तर, 7 ऑगस्टला सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडत 56 हजार 191 रुपये प्रतितोळा भाव गाठला.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
दिनांक | सोन्याचा भाव |
---|---|
3 ऑगस्ट, 2020 | 53 हजार 717 |
4 ऑगस्ट, 2020 | 54 हजार 551 |
5 ऑगस्ट, 2020 | 55 हजार 098 |
6 ऑगस्ट, 2020 | 55 हजार 845 |
7 ऑगस्ट, 2020 | 56 हजार 191 |
सोन्याचा भाव का वाढतोय?
जगात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोव्हिड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशातीलच नाही तर आंतराष्ट्रीय स्तरावर आर्थिक संकट आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतीतही वाढ दिसून आली आहे.
Gold Rate | अवघ्या 24 तासात सोने दरात मोठी वाढ, प्रतितोळ्याचा दर…https://t.co/XFG4BoIwXA
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 28, 2020
Gold Price Today
संबंधित बातम्या :