जगभरात आर्थिक मंदीचं सावट, सोन्याचे भाव वाढतेच, तर चांदीच्या किमतीत घट

| Updated on: Mar 09, 2020 | 11:15 PM

भारतीय शेअर बाजारात सोमवारी (9 मार्च) मोठी घसरण पाहायला मिळाली (Gold rate in Global market). दुसरीकडे सोन्याच्या किमतीत मात्र काहीशी वाढ पाहायला मिळाली.

जगभरात आर्थिक मंदीचं सावट, सोन्याचे भाव वाढतेच, तर चांदीच्या किमतीत घट
तज्ज्ञांच्या मते, पुढच्या काही दिवसांमध्ये सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. दिवाळीपर्यंत सोन्याची किंमत 60 ते 65 हजार प्रति 10 ग्रामपर्यंत पोहोचेल असं बोललं जात आहे.
Follow us on

नवी दिल्‍ली : भारतीय शेअर बाजारात सोमवारी (9 मार्च) मोठी घसरण पाहायला मिळाली (Gold rate in Global market). दुसरीकडे सोन्याच्या किमतीत मात्र काहीशी वाढ पाहायला मिळाली. जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचं सावट असल्यानं काळजीचं वातावरण आहे. त्यापार्श्वभूमीवर देशाची राजधानी दिल्लीत सोन्याचे प्रति तोळा (10 ग्रॅम) दर 45,063 रुपये झाले. एचडीएफसी सिक्‍युरिटीनुसार, याआधी हेच दर 45,041 रुपये प्रति तोळा इतके होते.

सोन्याच्या दरात काहीशी वाढ पाहायला मिळालेली असली तरी दुसरीकडे चांदीच्या किमतीत मात्र घट पाहायला मिळाली. चांदीच्या दरात प्रति किलो 710 रुपयांची घसरण झाली. सध्या चांदीचे दर 47,359 रुपये प्रति किलो झाले आहेत. याआधी हेच दर 48,069 रुपये प्रति किलो होते.

एचडीएफसी सिक्‍योरिटीच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ’24 कॅरेट स्‍पॉट गोल्‍डच्या किमतीत दिल्‍लीमध्ये 22 रुपये प्रति तोळा अशी शुल्लक वाढ झाली आहे. कच्चा तेलाच्या किमतीत मोठी घट पाहायला मिळाल्यानंतर जागतिक आर्थिक विकासावर मंदीचं सावट आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतीत वाढ होत आहे. कच्चा तेलाच्या बाजारातील चढउतारांमुळे आगामी काळातही सोन्याच्या किमतीत चढउतार सुरुच राहण्याची शक्यता आहे.

व्याज दर घटल्याने आणि बॉन्डच्या किमतीत घट झाल्याने सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याकडे पाहिलं जात आहे. त्यामुळेच सोन्याच्या किमतीची मागणी वाढत आहे. या वाढत्या मागणीसह सोन्याची किंमतही वाढत आहे. घरगुती शेअर बाजारात सोमवारी सेन्सेक्‍स 1,941 अंकांची घट होऊन बंद झाला. कंपन्यांचं भांडवल घटल्याने गुंतवणुकदारांना जवळपास 7 लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. कोरोना व्हायरसच्या कहरामुळे जागतिक शेअर बाजाराची स्थिती देखील अशीच आहे. जगभरातील शेअर बाजारांमध्ये घट पाहायला मिळत आहे.

आंतरराष्‍ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1,680 डॉलर प्रति औंस (28.35 ग्रॅम) आणि चांदीचे दर 16.82 डॉलर प्रति औंस असा आहे.

संबंधित बातम्या :

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’, सोन्याचा भाव घसरला

 

Gold rate in Global market