वादळग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देईन, रायगडच्या पाहणी दौऱ्यात आदिती तटकरेंची हमी

| Updated on: Jun 07, 2020 | 3:48 PM

नुकसानग्रस्त प्रत्येक नागरिकाला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी पालकमंत्री या नात्याने आपण कटिबद्ध असल्याचं रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं.

वादळग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देईन, रायगडच्या पाहणी दौऱ्यात आदिती तटकरेंची हमी
Follow us on

रायगड : नुकसानग्रस्त प्रत्येक नागरिकाला जास्तीत (Aditi Tatkare On Raigad Damage Caused By Cyclone) जास्त मदत मिळवून देण्यासाठी पालकमंत्री या नात्याने आपण कटिबद्ध असल्याचं रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं. नुकत्याच झालेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. येथील नुकसानग्रस्त नागरिकांसाठी मुख्यमंत्र्यांकडे विशेष आर्थिक पॅकेजची मागणी करणार असल्याचंही (Aditi Tatkare On Raigad Damage Caused By Cyclone) त्यांनी सांगितलं होतं.

माणगाव तालुक्यातील माणगाव, गोरेगाव, मोर्बा, सुर्ले आदिवासीवाडी, नागाव, वडवली, पुरार, वणी, नांदवी, इंदापूर इत्यादी नुकसानग्रस्त भागांची पाहाणी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी नुकसानग्रस्त प्रत्येक नागरिकाला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी पालकमंत्री या नात्याने आपण कटिबद्ध असल्याचं रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं.केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त भागातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या.

शहरी आणि ग्रामीण भागात माेठ्या प्रमाणात घरांचे पत्रे उडाले असून वीज पुरवठाही खंडित झालेला आहे. नुकसानीचे पंचनामे त्वरीत पूर्ण करुन सर्वांना तातडीने मदत पोहचविण्याचे निर्देश प्रांताधिकारी, तहसिलदार यांना देण्यात आले आहेत. जेणेकरुन जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत मिळेल. ज्या गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्याने पाण्याची समस्या उद्भवली आहे, त्या ठिकाणी टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी पोहाेचविले जात आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली (Aditi Tatkare On Raigad Damage Caused By Cyclone).

वीज पुरवठा पूर्ववत सुरु करण्यासाठी युध्दपातळीवर काम सुरु असून रायगड जिल्ह्यातील प्रत्येक नुकसानग्रस्त नागरिकाला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, असे आश्वासक वक्तव्य पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे (Aditi Tatkare On Raigad Damage Caused By Cyclone).

 

संबंधित बातम्या :

होम क्वारंटाईन कुणाला करावे, कोणाला नाही? वादळग्रस्त रायगडसाठी नियमावली

कपड्यांसाठी 1800, भांड्यांसाठी 2 हजार, घरांसाठी 95 हजार, वादळग्रस्तांसाठी उद्यापासून थेट मदत!

वादळामुळे झाडे पडून रस्ता बंद? मग फोटो आणि व्हिडीओ व्हॉट्सअॅप करा, रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून नंबर शेअर

रत्नागिरी जिल्ह्याला चक्रीवादळाचा फटका, 27 हजार घरांची पडझड, आंबा, काजू, पोफळीच्या बागांचेही नुकसान