गुजरातचं ठरलं, बारावीच्या परीक्षा ‘या’ तारखेपासून, महाराष्ट्राचा निर्णय कधी होणार?

| Updated on: May 25, 2021 | 7:21 PM

Gujarat Board 12th Exam

गुजरातचं ठरलं, बारावीच्या परीक्षा या तारखेपासून, महाराष्ट्राचा निर्णय कधी होणार?
Student
Follow us on

Gujarat Board 12th Examनवी दिल्ली:  बारावीच्या परीक्षा आयोजित करण्याबाबत रविवारी केंद्रीय शिक्षणमंत्री आणि सर्व राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांची मिटींग झाली. या बैठकीनंतर गुजरात राज्य सरकारच्यावतीनं बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. गुजरातचे शिक्षण मंत्री भूपेंद्र सिंह चुडासमा यांनी बारावीच्या परीक्षा नियमित पॅटर्न प्रमाणे 1 जुलै पासून घेण्यात येतील असं जाहीर केलं आहे. विज्ञान शाखेच्या पेपरममध्ये पहिल्या भागात बहूपर्यायी प्रश्न तर दुसऱ्या भागात दिर्घोत्तरी प्रश्नांचा समावेश असेल, असं त्यांनी जाहीर केलं आहे. गुजरात राज्यानं बारावीची परीक्षा जाहीर केली. महाराष्ट्र सरकार बारावी परीक्षेबाबत कधी निर्णय जाहीर करणार याकडं लक्ष लागलं आहे. (Gujarat Board 12th Exam to be held from July 1 GSEB HSC Exams 2021 said by Education Minister Bhupendrasinh Chudasama )

बारावीची परीक्षा 1 जुलैपासून दहावीची परीक्षा रद्द

गुजरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (GSHSEB) 1 जुलैपासून विज्ञान आणि सामान्य शाखेची बारावीच परीक्षा सुरु कणार आहे. गुजरात बोर्डानं कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट केलं जाणार आहे.

महाराष्ट्राची भूमिका काय?

महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी रविवारी पार पडलेल्या बारावीच्या परीक्षेसंदर्भातील उच्चस्तरीय बैठकीत सहभाग घेतला. ही बैठक सीबीएसईतर्फे बारावीची परीक्षा घ्यावी की न घ्यावी, किंवा कशी घ्यावी याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक होती. या बैठकीत महाराष्ट्र राज्य म्हणून आम्ही सहभाग घेतला. बैठकीत काही पर्यायांवर चर्चा झाली त्याबद्दल मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ बैठकीत बारावीच्या संदर्भात चर्चा करु. बारावीच्या विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षा बघूनचं यासंदर्भातील निर्णय व्हावेत, अशी भूमिका मांडल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. महाराष्ट्रात सीबीएसईचे 25 हजार विद्यार्थी आहेत तर बारावीचे महाराष्ट्र बोर्डाचे 14 लाख विद्यार्थी आहेत, त्यामुळे राज्य सरकार बारावी परीक्षेबाबत काय निर्णय घेतं हे पाहावं लागणार आहे.

कर्नाटक, तामिळनाडू राज्य परीक्षा घेण्याच्या बाजूनं

कर्नाटक आणि तामिळनाडूच्या शिक्षणमंत्र्यांनी बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या करिअरमधील महत्वाची गोष्ट असल्याचं सांगतिलं. कर्नाटकचे शिक्षणमंत्री सुरेश कुमार बारावीची परीक्षा आयोजित करण्याबाबत दोन दिवसांमध्ये निर्णय जाहीर करु असं सांगितलं. तर दुसरीकडे, तामिळनाडूचे शिक्षणमंत्री अंबिल महेश पोय्यामोझी यांनी बारावीच्या परीक्षा आयोजित करण्यास सहमती दर्शवली आहे.

संबंधित बातम्या:

बोर्डाच्या परीक्षा घेता येत नसतील तर राजीनामा द्या, प्रकाश आंबेडकर यांचा राज्य सरकारवर निशाणा

बारावीच्या परीक्षा झाल्याच पाहिजेत, ऑनलाईन परीक्षा हा देखील पर्याय, बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचं मत

(Gujarat Board 12th Exam to be held from July 1 GSEB HSC Exams 2021 said by Education Minister Bhupendrasinh Chudasama )