मुंबई : इंटरनेटवर एका व्यक्तीने आपल्या मित्राला भेटल्यावर हात मिळवण्याऐवजी पायाने हँडशेक (Coronavirus handshake new trick) केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे लोक हात मिळवण्याऐवजी पाय मिळवत असल्यामुळे सर्वत्र हा व्हिडीओ (Coronavirus handshake new trick) व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये एक मित्र गाडीतून उतरताना दिसत आहे. गाडीबाहेर उभा असलेला मित्र हँडशेक करण्यासाठी हात पुढे करतो. पण दुसरा मित्र त्याला विरोध करत पायाने हँडशेक करतो. तसेच प्रत्येकाने कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे तोंडावर मास्कही लावलेला दिसत आहे.
Have heard of Handshake but what LegShake greetings ??!!! #CoronaVirus Outbreak… pic.twitter.com/KPRQzbDLrE
— Ke_Stanley (@IngeniousOne1) March 1, 2020
हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तसेच या व्हिडीओला अनेक युझर्स कॉन्मेट करत आहेत. एका युझर्सने म्हटले की, “हात मिळवण्याचे माहित आहे. पण पायाने शेकहँड पाहिले नव्हते.”
Have heard of Handshake but what LegShake greetings ??!!! #CoronaVirus Outbreak… pic.twitter.com/KPRQzbDLrE
— Ke_Stanley (@IngeniousOne1) March 1, 2020
दरम्यान, कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी लोकांनी वापरलेली युक्ती पाहून युझर्स आनंदी दिसत आहेत.