चेन्नई: तमिळनाडूतील एका मंदिरात देवाच्या मूर्तीला हार घालताना खाली कोसळून एका पुजाऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. जवळपास 20 ते 25 फूट उंचीच्या मारुतीच्या मूर्तीला हार घालत असताना, शिडीवर उभ्या असलेल्या या पुजाऱ्याचा तोल गेला आणि तो खाली कोसळला. त्याचं डोकं जमिनीवर आदळलं आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. हनुमानाच्या मूर्तीला हार घालत असणारा पुजारा अचानक कोसळून त्याचा मृत्यू झाला हे चित्र अनेकांना न पटणारं होतं. हा पुजारा खाली कोसळल्यानंतर सहकारी पुजाऱ्यांनी तातडीने त्या पुजाऱ्याला उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.
हा पुजारा नेमका कसा कोसळला हा प्रश्नच आहे. व्हिडीओतील दृश्यानुसार या पुजाऱ्याचा पाय घसरल्याचं दिसतं.