मुंबई : अमेरिकेची प्रसिद्ध दुचाकी कंपनी Harley-Davidson ने मंगळवारी (27 ऑगस्ट) भारतात त्यांची पहिली इलेक्ट्रिक बाईक LiveWire चा लूक जारी केला आहे. भारतात या बाईकचं लाँचिंग लवकरच होऊ शकतं. मात्र, कंपनीने सध्या याबाबत कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
भारतीय बाजारात Harley-Davidson LiveWire ची किंमत 40-50 लाख रुपये असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत 29,799 डॉलर म्हणजेच जवळपास 21 लाख रुपये आहे. सुरुवातीला ही बाईक अमेरिका, कॅनडा आणि युरोपमध्ये विक्रिसाठी उपलब्ध असेल.
LiveWire मधील इलेक्ट्रिक मोटार 105hp चा पावर आणि 116Nm चा टॉर्क जनरेट करतो. ही बाईक फक्त 3 सेकंदांमध्ये 0 ते 100 किलोमीटर प्रती तासाचा वेग धरु शकते, असा दावा कंपनीने केला आहे. तर 100 ते 129 किलोमीटरचा वेग पकडण्यासाठी ही बाईक फक्त 1.9 सेकंद घेईल, असेही कंपनीने सांगितले.
Harley-Davidson LiveWire चे फीचर्स
Harley-Davidson LiveWire या बाईकचं लूक अत्यंत क्लासी आहे. जबरदस्त लूकसोबतच या बाईकमध्ये अनेक जबरदस्त फीचर्सही देण्यात आले आहेत. यामध्ये कॉर्नरिंग एबीएस (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम), ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम, रिअर व्हील लिफ्ट मिटिगेशन आणि स्लीप कंट्रोल सिस्टम सारखे सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहेत. त्याशिवाय यामध्ये 4.3 इंचाचा टीएफटी डिस्प्ले आणि 7 रायडिंग मोड्स देण्यात आले आहेत.
Harley-Davidson LiveWire ची रेंज
Harley-Davidson LiveWire या इलेक्ट्रिक बाईकमध्य हाय-व्होल्टेज 15.5 kWh लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही बाईक शहरात 235 किलोमीटर आणि हायवेवर 113 किलोमीटरपर्यंत धावेल. या बाईकला साध्या AC वॉल सॉकिटने लेवल-1 ऑन-बोर्ड चार्जरसोबत फुल्ल चार्ज करण्यासाठी 12.5 तासांचा वेळ लागतो. DC फास्ट-चार्जरने ही बाईक 1 तासात फुल्ल चार्ज होते.
संबंधित बातम्या :
Hero Electric Dash ई-स्कूटर लाँच, फुल्ल चार्जिंगवर 60 किमी धावणार
लवकरच मारुती सुझुकीची छोटी SUV भेटीला, किंमत फक्त…