कोल्हापूर : पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील शहीद जवान संग्राम पाटील (Martyr Sangram Patil) यांच्यावर आज (23 नोव्हेंबर) अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. संग्राम पाटील याचं पार्थिव कोल्हापुरातील निगवे खालसा गावात दाखल झाले आहे. गावातील चनिशेटी विद्यालयासमोरील क्रीडांगणावर त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दरम्यान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी निगवे खालसा गावाला भेट दिली. यावेळी मुश्रीफ यांनी शहीद जवान संग्राम पाटील यांच्या घराचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करू, असे आश्वासन त्यांच्या कुटुंबियांना दिले. (Hasan Mushrif on Martyr Sangram Patil House Dream)
हसन मुश्रीफ यांनी याबाबत ट्विटरवरुन माहिती दिली आहे, त्यांनी म्हटले आहे की, “आज करवीर येथील निगवे खालसा गावाला भेट देत शहीद जवान संग्राम पाटील यांच्या घराचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करु, अशी आदरांजली वाहिली.
शहीद संग्राम पाटील यांची पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबाची आहे. त्यांच्यामागे आई- वडील, पत्नी व लहान मुले असा परिवार आहे. या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखातून सावरण्याची शक्ती आणि हिंमत परमेश्वराने पाटील कुटुंबियांना द्यावी, अशी परमेश्वराचरणी प्रार्थना करतो”.
“पाटील परिवाराच्या पाठीशी हिमालयासारखे उभे राहणे ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. पाटील कुटुंबियांच्या आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील स्वीकारतीलच.
परंतु मी आज वर्तमानपत्रात वाचले की शहीद जवान संग्राम पाटील यांचे घर बांधायचे स्वप्न अपुरे राहिले आहे. त्यांचे हे स्वप्न मी फाऊंडेशनच्या माध्यमातून पूर्ण करेन. तसेच सोमवारी सकाळी अलोट गर्दीत होणाऱ्या अंत्यसंस्काराला सर्व ग्रामस्थ व नागरिकांनी संयम पाळून अखेरची मानवंदना द्यावी, असे आवाहनही केले”.
शहीद जवान संग्राम पाटील यांच्या घराचे अधुरे स्वप्न पूर्ण करू
निगवे खालसाला भेट
कोल्हापूर, दि.२२:
निगवे खालसा ता करवीर येथील शहीद जवान संग्राम पाटील यांच्या घराचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करू, अशी आदरांजली वाहिली. निगवे खालसा गावाला भेट दिली. https://t.co/dHH2p0SAzi pic.twitter.com/ZUF4GnUyRp— Hasan Mushrif (@mrhasanmushrif) November 23, 2020
मुश्रीफ यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, “गोरगरीब शेतकरी कुटुंबातील मुले परिस्थितीशी झगडत भारतीय सैन्यदलात भरती होत असतात. भारतमातेच्या संरक्षणासाठी जीवाची बाजी लावून ऊन, वारा, पाऊस आणि शत्रू अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी ते दररोज झगडत असतात. जवान शहीद झाल्यानंतर काही दिवस समाज त्यांना सहानुभूती दाखवतो. काळाच्या ओघात पुढे विसरून जातो आणि ही कुटुंब उघड्यावर पडतात, असे होता कामा नये. या कुटुंबियांच्या पाठीशी आपण सदैव हिमालयासारखे उभे राहिले पाहिजे”.
जम्मू काश्मीरमधील राजोरी भागात 16 मराठा पोस्टवर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात निगवे खालसा येथील संग्राम पाटील यांना (21 नोव्हेंबर) वीरमरण आलं. यानंतर दोन दिवसांनी त्यांचे पार्थिव मूळगावी दाखल झाले आहे. शहीद जवान संग्राम पाटील यांचे पार्थिव काश्मीरमधून विमानाने पुणे विमानतळावर येथे दाखल झाले. त्यानंतर रात्रीच ते पार्थिव कोल्हापुरात दाखल झाले. (Hasan Mushrif on Martyr Sangram Patil House Dream)
संबंधित बातम्या :
आठवडाभरात कोल्हापूरचा दुसरा जवान शहीद, निगवेचे संग्राम पाटील धारातीर्थी