मुंबई : दही (Curd) हा बहुतेक लोकांच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. दह्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. दररोज दही खाल्ल्याने केवळ ताजेतवाने वाटत नाही तर, पाचन तंत्रही ठीक राहते आणि पोटाचा त्रासही होत नाही (Health Benefits). दही ऑस्टिओपोरोसिस, रक्तदाब, केस आणि हाडे यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, राइबोफ्लेविन, व्हिटामिन बी 6 आणि व्हिटामिन बी12 या पोषक घटकांचे प्रमाण अधिक असते (Health Benefits of Curd).
जेवणात रोज दही खाणे आवश्यक आहे. दही खाल्ल्यामुळे शरीरातील समस्या दूर व्हायला मोठी मदत होते. दही पौष्टिक असल्यामुळे आरोग्यासंबधी आणि सौंदर्यासंबधित समस्यांवरदेखील दही खाणे हा उत्तम उपाय आहे. केसातील कोंड्यापासून त्वचा कोमल करण्यासाठी दह्याचा उपयोग होतो. रोज दह्यात गूळ किंवा खडीसाखर टाकून किंवा लस्सीच्या स्वरुपात दही खाल्ल्याने ते सौंदर्यवर्धक देखील ठरते.
आजकाल सर्वाना कंपनीचे डब्यातील पॅकबंद दहीच मिळते. पूर्वीच्या काळी बऱ्याच घरांमध्ये छान काळ्या मातीच्या मडक्यात उकळून कोमट झालेल्या दुधात सायंकाळी विरजण घालून दही तयार केले जायचे. दही बनवण्याच्या पद्धती व त्याचा स्वाद यावरून दह्याचे पाच प्रकार पडतात. मंद, गोड, आंबट-गोड, आंबट व अत्यंत आंबट असे हे पाच प्रकार. या प्रत्येक प्रकारानुसार, आजारानुसार व ऋतूनुसार दही सेवन केल्यास दह्याचे फार चांगले फायदे मिळतात. मात्र चुकीच्या पद्धतीने दही सेवन केल्यास नको असलेल्या आजारांनाही निमंत्रण मिळते. शरद, ग्रीष्म व वसंत ऋतूमध्ये दही खाणे हितकारक नसते. यामुळे कफ वाढून सर्दी, खोकला मागे लागतो (Health Benefits of Curd).
तसेच रात्रीदेखील दही खाऊ नये. खायचेच असेल तर, त्यात तूप, साखर, मुगाची डाळ, मध किंवा आवळा घालून खावे. अदमुरे म्हणजे अर्धवट लागलेल्या दह्याला ‘मंद दही’ असे म्हणतात. याचेही सेवन करू नये. याने त्रिदोष वाढतात, तसेच पोट बिघडून वारंवार शौच व मूत्रप्रवृत्ती होते. आंबट व अत्यंत आंबट दहीसुद्धा सेवन करू नये. यामुळे अनेक पित्ताचे व अपचनाचे विकार मागे लागतात. म्हणजेच फक्त गोड व आंबट-गोड दही आपण खाऊ शकतो. जे दही चांगले लागले आहे, जे मधुर रसदार व थोडे आंबट असते त्याला गोड दही असे म्हणतात. हे दही सर्वात उत्तम समजले जाते. हे शक्तिवर्धक असून यामुळे पचनशक्तीसुद्धा सुधारते, भूक वाढते. मात्र, मधुमेह झालेल्या व्यक्तीने कोणत्याच प्रकारचे दही सेवन करू नये.
(Health Benefits of Curd)
Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायकhttps://t.co/y89Pxceis3#VitaminD #FoodSupplement
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 20, 2020