Sharada Tope | राजेश टोपेंच्या मातोश्री शारदा टोपे यांच्या पार्थिवावर जालन्यात अंत्यसंस्कार

| Updated on: Aug 02, 2020 | 4:39 PM

जालन्यात कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना परिसरात शारदा टोपे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले

Sharada Tope | राजेश टोपेंच्या मातोश्री शारदा टोपे यांच्या पार्थिवावर जालन्यात अंत्यसंस्कार
Follow us on

जालना : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदा टोपे यांच्या पार्थिवावर जालन्यातील मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबईतील ‘बॉम्बे रुग्णालया’त उपचारादरम्यान काल (1 ऑगस्ट) त्यांची प्राणज्योत मालवली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शारदाताईंना सोशल मीडियावरुन श्रद्धांजली अर्पण केली. (Health Minister Rajesh Tope Mother Sharada Tope Last Rites in Jalna)

जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथे असलेल्या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना परिसरात शारदा टोपे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी पाथरवाला येथे काही धार्मिक विधी करण्यात आले. अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र sशिंगणे, आमदार राजेश राठोड, बालाजी कल्याणकर, प्रकाश गजभिये, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनीही अंत्यदर्शन घेतले.

शारदा टोपे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होत्या. मार्चमध्ये त्या महिनाभर रुग्णालयात दाखल होत्या. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. परंतु दोन महिन्यांनी पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंत्यसंस्कार होत असल्याने कोरोना संबंधीच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी ट्विटरवरुन दिली होती.

शरद पवार यांच्याकडून श्रद्धांजली

“सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे यांचे काल दीर्घ आजाराने निधन झाले. या दुःखद प्रसंगी टोपे कुटुंबियांचे सांत्वन करताना त्यांच्या दुःखात सहवेदना व्यक्त करतो.

माझे दिवंगत सहकारी व मित्र कर्मयोगी अंकुशराव टोपे यांना शारदाताईंनी आयुष्यभर निष्ठेने साथ दिली. अंकुशराव टोपे यांच्या निधनानंतर त्या कुटुंबाच्या पाठीशी समर्थपणे उभ्या राहिल्या. त्यांचे सुपुत्र राजेश टोपे यांनी आरोग्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची आव्हानात्मक परिस्थिती यशस्वीतेने हाताळताना आपल्या मातोश्रींच्या आरोग्याचीही अखेरपर्यंत योग्य काळजी घेतली.

माझे कुटुंबीय व पक्षाच्या वतीने दिवंगत शारदाताई अंकुशराव टोपे यांना भावपूर्ण श्रद्धांजली! ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!” अशा भावना शरद पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.

संबंधित बातम्या : 

स्वत:ची आई ICU मध्ये, मात्र लेकाची महाराष्ट्राला वाचवण्यासाठी धडपड, राजेश टोपेंना सलाम

आई दवाखान्यात, महाराष्ट्राचा लढवय्या लेक मैदानात, जयंत पाटलांकडून राजेश टोपेंचं आगळंवेगळं कौतुक

(Health Minister Rajesh Tope Mother Sharada Tope Last Rites in Jalna)