मुसळधार पावसाने हैद्राबाद आणि उपनगर भागात हाहाकार माजवल्याचं समोर आलं आहे. या पावसामुळे बुधवारी (14 ऑक्टोबर) देखील शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं दिसलं. यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. कुठे गाड्यांवर झाडं पडली, तर कुठे पार्क केलेल्या गाड्या साठलेल्या पाण्यात बुडाल्या. जोरदार पावसामुळे ठिकाठिकाणी अपघातही झाले. यात जवळपास 13 जणांचा मृत्यू झाला.
-
-
हैद्राबादमध्ये अनेक कॉलन्यांमध्ये पाणी शिरलं आहे. पावसाने पडलेल्या झाडांमुळे शहरातील रस्त्यांसह राष्ट्रीय महामार्गही प्रभावित झाला. त्यामुळे विजयवाडा आणि बंगळुरुपर्यंत वाहतूक कोंडी झाली.
-
-
पाऊस आणि वादळाने अनेक ठिकाणी झाडं पडली. या फोटोत झाड पडल्याने कारचं झालेलं नुकसान दिसत आहे.
-
-
मुसळधार पावसाने रस्ते देखील जलमय झाले. त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला. काही ठिकाणी पार्क केलेल्या गाड्याही पाण्यात बुडाल्या.
-
-
शहराच्या मध्यवर्ती भागात खैरताबाद, चिन्तल वस्ती, गांधीनगर, मारुतीनगर, श्रीनगर आणि आनंद बाग येथे अनेक कॉलन्यांमध्ये पाणी शिरलं. शहरातील अनेक भागात जवळपास 12 तासांपेक्षा अधिक काळ वीज नव्हती.
-
-
हैदराबादमधील हा पाऊस मागील दशकभरातील सर्वाधिक पाऊस असल्याचं सांगितलं जातंय. यामुळे शहर आणि शहराच्या सीमेवरील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं.
-
-
राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ), अग्निशमन दल आणि पोलिसांनी अनेक ठिकाणी पाण्यात अडकलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी प्रयत्न केले.
-
-
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, शहराच्या बाहेरील भागात घाटकेसरमध्ये 32.20 सेंटीमीटर इतका विक्रमी पाऊस झाला. हयातनगर आणि हस्तिनापुरममध्ये अनुक्रमे 29.45 आणि 28.30 मिलीमीटर पाऊस झाला.
-
-
भारतीय हवामान खात्याने हैदराबाद आणि आसपासच्या भागात आणखी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच नागरिकांनी घरातच सुरक्षित राहावं, बाहेर पडू नये, असं आवाहन केलं आहे.
-
-
हैदराबाद शहराचा जुना भाग असलेल्या बंदलागुडामध्ये पावसामुळे इमारतीची भिंत कोसळून अपघात झाला. ही भिंत दोन घरांवर कोसळल्याने 9 जणांचा मृत्यू झाल आणि 3 जण जखमी झाले.
-
-
शमशाबादमध्ये गगनपहाड भागात दोन व्यक्ती पाण्यात बुडाले आणि दोनजण बेपत्ता झाले. अब्दुल्लापूरमध्ये दोन आणखी नागरिकांचा मृत्यू झाला.