नवी दिल्ली : देशात सध्या आर्थिक मंदीमुळे ऑटोमोबाईल क्षेत्रातही (Automobile Industry) मंदी आली आहे. पण या दरम्यान बाजारात इलेक्ट्रिक सायकल (Electric Cycle) लाँच करण्यात आली आहे. या सायकलची किंमत एक लाखाहून अधिक आहे. इलेक्ट्रिक सायकलची (Electric Cycle) किंमत पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
प्रसिद्ध सायकल निर्माती कंपनी हिरो आणि मोटर कंपनी (Hero and Motor) यामाहाने पहिल्यांदाच एकत्र येत इलेक्ट्रिक सायकल बाजारात लाँच केली आहे. ही सायकल आधुनिक आणि विशेष पद्धतीने तयार केली आहे. तसेच यामध्ये काही खास फिचरही देण्यात आले आहेत. पण या सायकलची किंमतीने सर्वांचे लक्ष केंद्रित केले आहे. या सायकलची किंमत तब्बल 1 लाख 35 हजार रुपये आहे.
“सध्या 30 टक्के लोक गाड्या चालवतात ते आरोग्याबाबतीत जागृत आहेत आणि सायकल चालवणे पसंत करतात. याच पार्श्वभूमीवर लग्झरी आणि आरोग्यदायी सुविधांवर लक्ष केंद्रित करत ही सायकल लाँच केली आहे. हीरो आणि यामाहच्या या सायकलचे नाव Lectro EHX20 आहे”, असं हिरो कंपनीचे एमडी पंकज मुंजाल यांनी सांगितले.
बाजारात मिळणाऱ्या इतर इलेक्ट्रिक सायकलच्या तुलनेत या सायकलमध्ये बॅटरीने चालणारे इंजिन मागच्या बाजूला नसून पुढच्या बाजूला आहे. ही यासकल रिट्रीट सायकल आहे. त्यामुळे पेडल मारुनही चालवली जाऊ शकते आणि बॅटरीच्या सहाय्यानेही सायकल चालवली जाऊ शकते.
हीरो आणि यामाहच्या या नव्या सायकलचा लुक सर्वांना आकर्षित करत आहे. सायकलमध्ये आधुनिक गिअरही दिले असून त्यामध्ये अनेक खास फीचर दिलेले आहेत. ही सायकल सर्वात महागडी सायकल नसून याशिवाय पाच ते सहा लाख रुपयांच्याही सायकल बाजारात उपलब्ध आहेत.