मुंबई : देहव्यापार करणाऱ्या एका हायप्रोफाईल रॅकेटचा मुंबईला लागून असलेल्या नालासोपाऱ्यात पर्दाफाश करण्यात आलाय. गुगल आणि सोशल मीडियावर जाहिरात करून, ग्राहकांना आकर्षित केलं जात होतं. ग्राहक ठरलं की त्याला बोलावून युनिसेक्स सलून आणि स्पामध्येच सेक्स रॅकेट चालवलं जात होतं. पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांच्या पथकाला याची माहिती मिळताच त्यांनी शनिवारी रात्री नऊ वाजता छापा मारून या सेक्स रॅकेटचा भांफाफोड केला.
नालासोपारा पूर्व यशवंत विवा टाऊनशीप हा परिसर हायप्रोफाईल वस्तीचा आहे. या परिसरातील इम्रॉल्ड टॉवर या इमारतीच्या तळ मजल्यावर रिलॅक्स युनिसेक्स सलून अँड स्पा हे सेंटर आहे. या सेंटरची गुगल आणि सोशल मीडियावर जाहिरात करण्यात आली होती. याच जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित केलं जायचं.
ग्राहक कंफर्म झाल्यानंतर त्याला फोन करुन बोलवलं जायचं आणि स्पा सेंटरमध्येच रॅकेट चालवलं जात होतं. या सेंटरमध्येच वेगवेळ्या पार्टिशन मारून रुमही काढल्या होत्या. पीडित महिलांना बोलावून त्या महिलांना सेक्ससाठी प्रवृत्त केलं जात असल्याचंही सांगण्यात येतंय.
पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला पाठवलं. बनावट ग्राहक पाठवून पोलिसांना सापळा रचला आणि छापा मारला. यात 19 वर्षांच्या एका पीडित मुलीची सुटका करून, स्पा चालवणारी महिला आणि दोन दलालांना ताब्यात अटक करण्यात आलंय. मॅनेजर नथुराम रमेश मांडवकर आणि दलाल सुभाष ओझे शर्मा, असे अटक केलेल्या आरोपींचे नावं आहेत.