मुंबई : हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपीसीएल) कंपनीची पाईपलाईन (Hindustan Petroleum Diesel Theft) तोडून त्यातून हजारो लिटर तेल चोरणाऱ्या टोळीचा भांडाभोड करण्यात आला आहे. ही टोळी चेंबूर परिसरात असलेल्या तेल कंपनीतील पाईपलाईन मधून हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपीसीएल) कंपनीची पाईपलाईन तोडून त्यातून हजारो लिटर तेलाची चोरी करत होती. या टोळीतील दोघांना आरसीएफ पोलिसांनी अटक केली (Hindustan Petroleum Diesel Theft) आहे.
या टोळीतील किशोर विश्वनाथ सिरसोडे (वय 36) आणि मोहम्मद इरफान मोहम्मद हुसेन पठाण उर्फ गजू (वय 24) या दोघांना अटक करण्यात आली आहे. आरसीएफ पोलीस स्टेशनअंतर्गत एचपीसीएल कंपनीच्या आवारात काही जण तेल चोरुन नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी एक पथक तयार करुन तपासणी केली. तेव्हा बीपीसीएल कंपनीच्या भिंतीजवळ टँकर पार्किंगजवळील शिव अभियांत्रिकी कार्यशाळेच्या मागे तेल चोरी करण्याच्या उद्देशाने लोखंडाच्या पाईपच्या सहाय्याने पॉईंट काढल्याचे निष्पन्न झाले. ते यामार्फत डिझेलची चोरी होत होते.
पोलिसांनी एचपीसीएलच्या अधिकाऱ्यांना बोलावून याची तपासणी केली आणि गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर, इतर आरोपींचा शोध घेत आहेत. या ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून असा प्रकार सुरु होता (Hindustan Petroleum Diesel Theft).
ही डिझेल माफिया टोळी हिंदुस्तान पेट्रोलियमची पाईपलाईन तोडायची आणि नियोजित पद्धतीने बाजारात डिझेल विकत होते. तेल कंपन्यांच्या वतीने सुरक्षा कर्मचारी म्हणून या ठिकाणी सुरक्षा रक्षक आहेत. मात्र, तरी सुद्धा कंपनीला डिझेल चोरी बद्दल तेल कंपनीच्या अधिकाऱ्यांना याची माहिती नाही, या बाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
भिंतीत बोगदा खणून पाईपलाईन, कंट्रोल वॉल्व्हच्या माध्यमातून हजारो लिटर डिझेलची चोरी
या टोळीने ही चोरी करण्यासाठी एक बोगदा बनविला आणि वॉल्व्ह जोडून पाईपलाईन टाकली. या कंट्रोल वॉल्व्हच्या माध्यमातून ही टोळी हजारो लिटर डिझेलची चोरी करत ते कंटेनरमध्ये जमा करायची. त्यानंतर ते स्वस्त दरात पेट्रोल पंप आणि कंपन्यांना विकायचे. हे काम गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
यापूर्वीही येथे अशी प्रकरणं उघड झाली आहेत. असे असूनही तेल माफिया उघडपणे हा व्यवसाय करत होते. आता या संपूर्ण प्रकारची चौकशी करुन दोषींवर कारवाई करणार असल्याची माहिती आरपीएफ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोपान निघोट यांनी दिली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह भासवलं, क्वारंटाईन सेंटरमध्ये बोलावून 21 वर्षीय तरुणीची छेडछाडhttps://t.co/ec4gYn01la #Mumbai #MumbaiFightsCovid19
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 22, 2020
Hindustan Petroleum Diesel Theft
संबंधित बातम्या :
शिर्डीत साईमंदिराजवळ व्यावसायिकाची आत्महत्या, स्वत: च्या दुकानातच गळफास
दागिने गहाण ठेऊन घरफोडीचा बनाव, स्वतःवरील कर्ज फेडण्यासाठी बिल्डरच्या पत्नीचा प्रताप