सोलापूर: जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे बार्शी तालुक्यातील सर्वात मोठा मध्यम प्रकल्प हिंगणी शंभर टक्के भरला आहे. प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्यानं भोगावती नदीला पूर आला आहे. हिंगणी प्रकल्प भरल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. अनेक भागात पावसामुळे ओढे-नाले भरून वाहू लागले आहेत (Hingani Project overflow and Bhogavati river flooded in Barshi taluka of Solapur)
चित्रा नक्षत्रात पडलेल्या परतीच्या पावसामुळे वैराग भागातील हिंगणी धरण शंभर टक्के भरले. यामुळे वैराग शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. ढाळे पिंपळगाव, जवळगाव हे मोठे प्रकल्प भरले तरी हिंगणी धरण भरले नव्हते. मात्र, आता हिंगणी धरण भरल्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांतूनही समाधान व्यक्त केले जात आहे.
हिंगणी प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने भोगावती नदीला पूर आला आहे.यामुळे पिंपर,हिंगणी गावचा संपर्क तुटला आहे. भोगावतीला पूर आल्यानं रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेले होते. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.
दरम्यान, खरिप हंगामातील पिकांची काढणी सुरू असताना पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांना फटका बसला आहे. सोयाबीन सह फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोलापूरमध्ये तीन दिवसांपासून पाऊस हजेरी लावत आहे.
शनिवार पासून सुरू असलेल्या पावसाने पंढरपूर मंगळवेढा, माळशिरस, माढा या तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पंढरपूर शहरात सर्वाधिक 75 मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे. अनेक भागात पावसामुळे ओढे-नाले भरून वाहू लागले आहेत
संबंधित बातम्या:
Maharashtra Rain | मुंबई-पुणे ते औरंगाबाद, सोलापूर-कोल्हापूरपर्यंत जोरदार पाऊस
मुंबईसह 16 जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस, हवामान विभागाचा अंदाज
(Hingani Project overflow and Bhogavati river flooded in Barshi taluka of Solapur)