हिंगोलीः हिंगोलीच्या (Hingoli) वसमत तालुक्यातील टेंभुर्णी येथील उषा दत्तराव सवंडकर यांना तीळं झालीत. यामध्ये 2 मुली आणि एका मुलाचा (Baby Birth) समावेश आहे. सवंडकर दाम्पत्याचा 2003 म्हणजे 19 वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. अनेक वर्षे उलटून ही त्यांना अपत्य नव्हतं. त्यामुळे ते अपत्याची प्रतीक्षा करीत होते. आता त्यांची प्रतीक्षा संपली असून एका आपत्याची आस लावून बसलेल्या गरीब कष्टकरी दाम्पत्याच्या(Farmer) उदरी तीन तीन हट्टेकट्टे अपत्य जन्माला आलीत. त्यामुळे त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाहीये. आईची आणि बाळांची ही प्रकृती चांगली असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
हिंगोली जिल्ह्यात अपत्यासाठी 19 वर्ष प्रतीक्षा केलेल्या दाम्पत्याला एकदाच दोन मुली आणि एक मुलगा झाल्याने जोडप्याच्या आनंदाला पारावार उरला नाही.
एका अपत्याची आस लावून बसलेल्या जोडप्याला तिळं झाल्यानं कुटुंबियांनीही हा आनंद साजरा करायचं ठरवलं आहे.
गरीब कष्टकरी आणि मेहनती असलेल्या या जोडप्याला तिळं झाल्यानं आनंद तर झालाय, मात्र अल्पभूधारक शेतकरी असल्यानं यांचा सांभाळ कसा करायचा, याची काहीशी चिंता त्यांना सतावत आहे.
इतर बातम्या-