प्रसिद्ध अभिनेत्री पामेला अँडरसन पाचव्यांदा लग्नाच्या बेडीत, नवरा 22 वर्षांनी मोठा

| Updated on: Jan 23, 2020 | 5:46 PM

हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि 'बेवॉच' स्टार पामेला अँडरसन (Pamela Anderson) ही पाचव्यांदा लग्न बेडीत अडकली आहे. तिने हॉलिवूडमधील निर्माते जॉन पीटर्ससोबत (Jon Peters) लग्न केलं आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री पामेला अँडरसन पाचव्यांदा लग्नाच्या बेडीत, नवरा 22 वर्षांनी मोठा
Follow us on

कॅलिफोर्निया : हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘बेवॉच’ स्टार पामेला अँडरसन (Pamela Anderson) ही पाचव्यांदा लग्न बेडीत अडकली आहे. तिने हॉलिवूडमधील निर्माते जॉन पीटर्ससोबत (Jon Peters) लग्न केलं आहे. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर पामेला अँडरसनने ‘बॅटमॅन’ सिनेमाचे निर्माते जॉन पीटर्ससोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. सध्या पामेला अँडरसनचं लग्न खूप चर्चेत आहे. विषेश म्हणजे पामेलाचा नवरा जॉन पीटर्स हा तिच्यापेक्षा तब्बल 22 वर्षांनी मोठा आहे. पामेला ही ,सध्या 52 वर्षांची आहे, तर जॉन पीटर्स हा 74 वर्षांचा आहे (Pamela Anderson Fifth Wedding).

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पामेला अँडरसन आणि जॉन पीटर्सने एका खाजगी कार्यक्रमादरम्यान कॅनिफोर्नियाच्या मालिबु समुद्रकिनाऱ्यावर (Malibu Beach) लग्न केलं. पामेला अँडरसन ही ‘बिग बॉस’ (Bigg Boss) च्या चौथ्या सीझनमध्ये कंटेस्टंट म्हणून दिसली होती. ती बिग बॉसमधील आतापर्यंतच्या सर्वात महागड्या कंटेस्टंटपैकी एक आहे. पामेला ही बिग बॉसच्या घरात फक्त चार दिवस होती. यासाठी तिला तब्बल दोन कोटींची ऑफर देण्यात आली होती.

पामेला अँडरसनने जॉन पीटर्ससोठी एक प्रेम कविताही लिहिली, यामध्ये तिने जॉन पीटर्सला ‘ओरिजिनल बॅड बॉय’ सांगितलं आहे. पामेला अँडरसनच्या या कवितेचं नाव ‘द ओरिजिनल ‘बॅड बॉय’ ऑफ हॉलिवूड (The Original Bad Boy Of Hollywood)’ आहे. जॉन पीटर्स हे एका काळात हॉलिवूडमध्ये हेयरड्रेसर हाते.

पामेला अँडरसन तिच्या प्रोफेशनल लाईफच्या तुलनेत पर्सनल लाईफसाठी अधिक चर्चेत राहिली आहे. हे पामेला अँडरसनचं पाचवं लग्न आहे. पामेलाने अमेरिकन संगीतकार टॉमी लीसोबत पहिलं लग्न केलं होतं. लग्नाच्या तीन वर्षातच या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पामेलाने कीड रॉकसोबत लग्न केलं. मात्र, तेही लग्न टिकू शकलं नाही. त्यानंतर तिसऱ्यांदा पामेलाने सिनेमा निर्माता रिक सोलोमनसोबत लग्न केलं. त्यानंतर सोलोमनशी घटस्फोट झाला, मग पुन्हा तिने सोलोमनशी लग्न केलं. सोलोमनपासून वेगळं झाल्यानंतर पामेला हिचं फ्रेन्च सॉकर स्टार आदिल रामी सूत जुळलं, ती आदिलसोबत फ्रान्समध्ये राहू लागली होती, मात्र त्यांनी लग्न केलं नाही. त्यानंतर आता तिने पाचव्यांदा जॉन पीटर्ससोबत लग्न केलं.

Pamela Anderson Fifth Wedding