नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना डिस्चार्ज मिळाला आहे. थकवा आणि अंगदुखीचा त्रास होत असल्याने शाहांना ‘एम्स’मध्ये अॅडमिट करण्यात आले होते. जवळपास दोन आठवड्यांच्या उपचारानंतर शाह यांना घरी सोडण्यात आले. (Home Minister Amit Shah discharged from AIIMS Hospital)
पोस्ट कोव्हिड लक्षणे दिसत असल्याने अमित शाह यांना 18 ऑगस्टला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ‘एम्स’चे संचालक आर गुलेरिया यांच्या निगराणीखाली शाह होते. तेरा दिवसांच्या उपचारानंतर अमित शाह यांना घरी सोडण्यात आले.
अमित शाह यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती 2 ऑगस्ट रोजी समोर आली. अमित शाह यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार करण्यात आले. जवळपास दहा ते बारा दिवसांच्या उपचारानंतर 14 ऑगस्टला शाह यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला.
अमित शाह यांनी 14 ऑगस्टला स्वत: ट्विटरवर माहिती देत कोरोनामुक्त झाल्याचे सांगितले. “माझा कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आला. मी परमेश्वराचा आभारी आहे. या दरम्यान ज्यांनी माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना केली, मला आणि माझ्या कुटुंबियांना मानसिक पाठबळ दिलं, अशा प्रत्येकाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. मी आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणखी काही दिवस आयसोलेशमध्ये राहीन” असं अमित शाह त्यावेळी ट्विटरवर म्हणाले होते.
Union Home Minister Amit Shah, who was admitted for post-COVID care, discharged from AIIMS Delhi: Sources
— Press Trust of India (@PTI_News) August 31, 2020
“अमित शाह यांना थकवा आणि अंगदुखीचा त्रास जाणवत आहे. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. पोस्ट कोव्हिड केअरसाठी शाह यांना ‘एम्स’मध्ये दाखल करण्यात आले आहे. ते स्वस्थ असून रुग्णालयातून कामही करत आहेत” अशी अधिकृत माहिती ‘एम्स’ रुग्णालयाने त्यांना दाखल केल्यानंतर (18 ऑगस्ट) दिली होती. तर शाह यांची तब्येत रिकव्हर झाली असून लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळेल, असे ‘एम्स’ने 29 ऑगस्टला सांगितले होते.
VIDEO : टॉप 9 न्यूज | 31August 2020 https://t.co/JP5R34Gfqz
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 31, 2020