नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांना कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द शाह यांनीच ट्विटरद्वारे माहिती दिली. आपल्या संपर्कातील व्यक्तींना कोव्हिड चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. (Home Minister Amit Shah tested Corona Positive)
“कोरोनाची प्राथमिक लक्षणं दिसल्याने मी माझी चाचणी केली आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत ठीक आहे, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात दाखल होत आहे. मी आवाहन करतो, तुमच्यापैकी जो कोणी गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आला असेल, त्यांनी कृपया स्वत: विलगीकरणात राहावे आणि आपली चाचणी करुन घ्यावी” असे आवाहन अमित शाह यांनी केले आहे.
कोरोना के शुरूआती लक्षण दिखने पर मैंने टेस्ट करवाया और रिपोर्ट पॉजिटिव आई है। मेरी तबीयत ठीक है परन्तु डॉक्टर्स की सलाह पर अस्पताल में भर्ती हो रहा हूँ। मेरा अनुरोध है कि आप में से जो भी लोग गत कुछ दिनों में मेरे संपर्क में आयें हैं, कृपया स्वयं को आइसोलेट कर अपनी जाँच करवाएं।
— Amit Shah (@AmitShah) August 2, 2020
दिल्लीत कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अमित शाह अॅक्टिव्ह झाले आहेत. दिल्लीत वाढलेल्या चाचण्यांचे श्रेय महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शाहांना दिले आहे. मात्र गेल्या काही दिवसात अमित शाह यांनी अनेक कार्यक्रमांनाही उपस्थिती लावली आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात अनेक जण आले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी राम मंदिराचे भूमिपूजन केले जाणार आहे. यासाठी अयोध्येत मोठ्या प्रमाणात तयारी सुरु आहे. मात्र या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहू शकणार नाहीत, असे दिसते.
ट्विटरवर अनेक जणांनी अमित शाह यांच्या प्रकृतीत सुधारणेसाठी शुभेच्छा आणि प्रार्थना केल्या आहेत.
Wishing you a speedy recovery and good health Sir … Get well soon @AmitShah https://t.co/48SVmdSfA7
— Riteish Deshmukh (@Riteishd) August 2, 2020
Get well soon @AmitShah Praying for your speedy recovery God bless https://t.co/48LvKKb67S
— Suresh Prabhu (@sureshpprabhu) August 2, 2020
(Home Minister Amit Shah tested Corona Positive)