पुणे : कतारहून मुंबई विमानतळावर आलेल्या एका तरुणाला होम क्वारंटाईनची सूचना देण्यात आली (Home quarantine patient travel in railway) होती. सूचना देऊनही हा तरुण मुंबईहून गुलबर्गा येथे जाण्यासाठी रेल्वेतून निघाला. पण या दरम्यान उद्द्यान एक्सप्रेसमधील रेल्वे अधिकाऱ्यांनी तरुणाच्या हातावरील शिक्का पाहून त्याला दौंड रेल्वे स्थानकावर उतरवले. स्थानकावर उतरवल्यानंतर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे तरुणाला तब्बल दोन तास स्थानकावर स्ट्रेचनवर झोपून राहावे लागले. त्यामुळे आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार (Home quarantine patient travel in railway) समोर आला आहे.
हा तरुण कतारवरुन मुंबई विमानतळावर आला होता. त्यावेळी त्याच्या हातावर शिक्का देऊन त्याला क्वारंटाईनची सूचना दिली होती. पण त्याने या सूचनेच्या विरोधात जाऊन रेल्वे प्रवास केला. त्यामुळे त्याला दौंड येथे रेल्वेतून उतरवले. ही रेल्वे दुपारी 1 वाजून 5 मिनिटांनी दौंड रेल्वे स्थानकावर दाखल झाल्यानंतर डॉ. श्रीनिवास यांच्या निरीक्षणाखाली या तरुणाला खाली उतरवण्यात आले. यानंतर तो प्रवास करत असलेल्या डब्यावर फवारणी करुन त्यातील प्रवाशांना इतर डब्यात हलवण्यात आले.
या तरुणांची प्राथमिक तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला पुढील उपचार आणि तपासणीसाठी पुण्यात नेले. मात्र पूर्वसूचना असतानाही रुग्णवाहिकाच उपलब्ध न झाल्यामुळे या तरुणाला तब्बल 2 तास रेल्वे स्थानकावर एका स्ट्रेचरवर पडून राहावे लागले. एकीकडे कोरोनामुळे सर्वसामान्यामध्ये धास्ती वाढलेली असताना दौंडच्या रेल्वे स्थानकात आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभाराचा फटका प्रवाशी आणि संबंधित तरुणाला सोसावा लागला असल्याचे समोर आलं आहे.
दरम्यान, आज (21 मार्च) दिवसभरात मुंबई ते जबलपूर एक्सप्रेसमध्येही 12 कोरोना बाधित रुग्ण आढळले तर संपर्क क्रांती ट्रेनमध्येही आठ जण कोरोना बाधित रुग्ण आढळले. त्याशिवाय अनेक जणांना होम क्वारंटाईन देऊनही ते फिरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाने अनेक कठोर पाऊल उचपलली आहेत.
संबंधित बातम्या :
Corona Live Update : संपर्क क्रांती एक्सप्रेसमधून प्रवास केलेले 8 जण कोरोनाबाधित
रेल्वेतून प्रवास केलेल्या 12 जण कोरोना पॉझिटिव्ह, कोरोनाचं संकट वाढलं