पुणे : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन घोषित केला (Hotel Business loss Pune) आहे. लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांशिवाय इतर सर्व दुकानं बंद करण्यात आली आहेत. अशामध्ये पुण्यात मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यवसायिकांची एक हजार कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुळे केंद्राच्या पॅकेजमधून हॉटेल व्यवसायिकांना आर्थिक पाठबळ देण्याची मागणी आता जोर धरु लागली (Hotel Business loss Pune) आहे.
देशात लॉकडाऊन असल्यामुळे सर्वाधिक छोटे-मोठी दुकानं आणि उद्योगधंदे बंद आहेत. त्यामुळे अनेकांना आर्थिक फटका बसला आहे. पुणे आणि पिंपरीमधील खानावळी, उपाहारगृह, घरगुती डबे, असे 15 हजार छोट्या मोठ्या व्यवसायिकांना पाचशे कोटींचा फटका बसला आहे.
“हॉटेलचे भाडे, कामगारांचे पगार, कर्जाचे हप्ते अशा अनेक समस्या हॉटेल व्यवसायिकांना भेडसावत आहेत. त्यामुळे सरकारने हॉटेल व्यवसायिकांना मदत करावी”, अशी मागणी पुणे रेस्टॉरंट हॉटेलिअर असोसीएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी केली आहे.
दरम्यान, पुणे शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पुणे शहरात काल एका दिवसात 202 नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 295 वर पोहोचली आहे.
संबंधित बातम्या :
पुणे जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढताच, बाधितांचा आकडा 3,795 वर
Maharashtra Corona Cases | राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 30 हजार पार, दिवसभरात 67 मृत्यू, 1606 नवे रुग्ण