हिवाळ्यात बहुतांश लोकांचे ओठ कोरडे होऊन फुटतात. कारण अतिथंडीमध्ये वातावरणात खूप थंडावा असतो त्यामुळे त्याचा ओठांवर परिणाम होऊन ओठ कोरडे होऊन फुटतात. हवेतील ओलावा आणि घरातील उष्णतेची कमतरता ओठांमधील नैसर्गिक ओलावा काढून टाकते, ज्यामुळे ओठ कोरडे पडू लागतात. अशा तऱ्हेने ओठ मऊ आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी लोकं अनेकदा महागड्या लिप बामचा वापर करतात, पण हेच महागडे लीप बाम ओठांना बराच वेळ मुलायम ठेवत नाही.
हिवाळ्यात ओठ मऊ आणि हायड्रेटेड ठेवायचे असतील तर तुम्ही घरीच स्वत:साठी लीप बाम बनवा. हे लीप बाम तुमचे ओठ दिवसभर हायड्रेटेड ठेवतील. त्यातच तुम्ही हे लीप बाम घरगुती पद्धतीने म्हणजेच घरात उपलब्ध असलेल्या मटेरियलपासून बनवले असल्याने या लीप बामचा तुमच्या ओठांवर कोणताही दुष्परिणाम होण्याची शक्यताही कमी असते. चला तर मग जाणून घेऊया घरच्या घरी नैसर्गिक लीप बाम कसे बनवायचे.
हिवाळ्यात ओठांना मुलायम ठेवण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम अर्धा कप बीटरूट किसून त्याचा रस गाळून घ्यावा. आता बीटरूटच्या रसात १ चमचा तूप घालून चांगले मिक्स करा. नंतर हे मिश्रण एका छोट्या भांड्यात टाकून फ्रिजमध्ये ठेवावे. तुमचा लिप बाम तयार आहे. हे ओठांवर लावा. तूप ओठांची त्वचा खोलवर हायड्रेट करते आणि ओलावा टिकवून ठेवते.
मेणाचा लीप बाम बनवण्यासाठी १ चमचा बीसवॅक्स मेण , १ चमचा खोबरेल तेल, १ चमचा मध आणि २ व्हिटॅमिन ई कॅप्सूल घ्या. एका सॉस पॅनमध्ये बीसवॅक्स मेण घालून मध्यम आचेवर वितळवाव्या. ते वितळल्यावर त्यात खोबरेल तेल आणि मधाचे काही थेंब घाला. यानंतर व्हिटॅमिन ई कॅप्सूलचे तेल घालून चांगले मिक्स करावे आणि नंतर एका कंटेनरमध्ये ठेवावे. सुमारे 30 मिनिटे थंड होऊ द्या. तुमचा होममेड लिप बाम तयार आहे, ज्यामुळे ओठ मऊ आणि हायड्रेटेड राहतील.
नारळामध्ये नैसर्गिक मॉइश्चरायझिंग गुणधर्म ओठांना हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात. हे लीपबाम तुमच्या ओठांना तासनतास मऊ आणि चमकदार ठेवतात. हा लीप बाम बनवण्यासाठी नारळाचे तेल आणि पेट्रोलियम जेली समप्रमाणात मिसळा. नंतर हे मिश्रण एअरटाइट कंटेनरमध्ये घाला आणि सुमारे 30 मिनिटे गोठण्यासाठी ठेवा. ३० मिनिटानंतर पुन्हा चेक करा कि मिश्रण व्यवस्थित गोठले गेले आहे का जर ते नीट गोठले गेले असेल तर तुमच्या ओठांना मुलायम ठेवण्यासाठी तुमचा लीप बाम तयार आहे. हे घरगुती लिप बाम घरी बनवून तुम्ही तुमच्या ओठांना कोरडे होऊन फुटण्यासाठी वाचवू शकता.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती आणि उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)