हस्टन (टेक्सास) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 22 सप्टेंबरला अमेरिकेच्या दौऱ्यावर असणार आहेत (PM Modi USA tour). यावेळी अमेरिकेतील हस्टन शहरातील भारतीयांशी ते संवाद साधणार आहेत. त्यामुळे जगात ऊर्जेची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमेरिकेच्या हस्टन शहरात सध्या ‘हाउडी, मोदी’ या कार्यक्रमाची जंगी तयारी सुरु आहे (Howdy Modi in Houston). हस्टनच्या रस्त्यांवर या कार्य़क्रमाचे मोठ-मोठे बॅनर लावण्यात आले आहेत (huge billboards to welcome Modi). 22 सप्टेंबरला होणाऱ्या या कार्यक्रमासाठी आतापर्यंत 50 हजारापेक्षा जास्त लोकांनी नोंदणी केली आहे (Howdy Modi).
दक्षिण-पश्चिम अमेरिकेत ‘हाऊ डू यू डू’ (आपण कसे आहात?)याला सामान्य बोली भाषेत ‘हाउडी’ असं म्हटलं जातं.
अमेरिकेच्या रस्त्यांवर मोदींचे बॅनर
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या कार्यक्रमासाठी हस्टन शहरात मोठा उत्साह पाहायला मिळतो आहे. हस्टनच्या सर्व प्रमुख रस्त्यांवर मोदींच्या स्वागतासाठी मोठ-मोठे बॅनर लावण्यात आले आहेत. शहरात राहणाऱ्या सर्व भारतीय लोकांच्या घराबाहेर तिरंगा फडकलेला आहे. या कार्यक्रमासाठी सर्व खूप उत्साहित आहेत आणि आम्हाला येणाऱ्या पिढ्यांसाठी हा कार्यक्रम विस्मरणीय बनवायचा आहे, असं एका अमेरिकेतील भारतीयाने सांगितलं.
या कार्यक्रमाची सुरुवात ‘वुवेन : दी इंडियन-अमेरिकन स्टोरी’ ने होईल. 90 मिनिटांच्या या कार्यक्रमात सांस्कृतिक, बौद्धिक आणि सामाजिक क्षेत्रात अमेरिकेतील भारतीयांचं योगदान दाखवलं जाईल. तसेच, ‘शेयर्ड ड्रीम्स, ब्राईट फ्युचर’ कार्यक्रमात अमेरिकेतील भारतीयांचं यश आणि अमेरिकेतील त्यांचं योगदान दाखवलं जाईल. कार्यक्रमात सहभाग घेणारे आणि घरी बसून हा कार्यक्रम पाहणारे सर्वच लोक याच्याशी संलग्न व्हावेत, असं कार्यक्रमाचे प्रवक्ते गीतेश देसाई यांनी सांगितलं.
हस्टनच्या एनआरजी स्टेडिअममध्ये होत असलेल्या या कार्यक्रमाचं आयोजन टेक्सास इंडिया फोरम (टीआयएफ) ने केलं आहे.
2014 ला पंतप्रधान झाल्यापासून मोदी तिसऱ्यांदा अमेरिकेतील भारतीयांना संबोधित करणार आहेत. 2014 मध्ये त्यांनी न्युयॉर्कच्या मेडिसन स्क्वेअर आणि 2016 मध्ये सिलिकॉन व्हॅली येथे अमेरिकेतील भारतीय लोकांना संबोधित केलं होतं. दोन्ही कार्यक्रमांमध्ये 20 हजाराहून जास्त लोकांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला होता.
संबंधित बातम्या :
व्यापार युद्धामुळे जीडीपी घसरला, बेरोजगारी वाढली, अमेरिकेपुढे चीनची माघार
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची हकालपट्टी
UNHRC : पाकिस्तानची खोटेपणाची कॉमेंट्री, काश्मीरप्रश्नी भारताचे खडेबोल
रशिया दौरा : मोदींना 19 वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ क्षणाची आठवण