मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची प्रमुख भूमिका असलेला सुपर 30 चित्रपट प्रदर्शित होऊन काही तास उलटत नाहीत, तोच हा चित्रपट इंटरनेटवर लीक झाला आहे. पायरसी करणाऱ्या एका साईटने हा चित्रपट लीक केल्याची माहिती ‘फिल्मी बीट’ या वेबसाईटने दिली आहे. हा चित्रपट लीक झाल्याने अनेकजण तो डाऊनलोड करत आहे.
देशातील विख्यात गणितज्ज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट बनवण्यात आला आहे. काल (12 जुलै) हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला. मात्र हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही तासांच्या आत एका साईटने तो ऑनलाईन लीक केला आहे. त्यामुळे हा संपूर्ण चित्रपट वेबसाईटवर उपलब्ध झाला आहे. यामुळे याचा परिणाम चित्रपटाच्या कमाईवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या चित्रपटाला सिनेसमीक्षकांनीही चांगले रिव्ह्यू दिले आहेत.
याआधी बॉलिवूडचे अनेक चित्रपट ऑनलाईन लीक झालेत. त्यामुळे या चित्रपटांच्या कमाईत घट झाल्याची समोर आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर पायरसी करणाऱ्या या वेबसाईट तातडीन बंद केल्या जाव्या अशी मागणी चित्रपटसृष्टीने केली होती. मात्र यावर कोणताही तोडगा अद्याप निघालेला नाही. दरम्यान यानंतर आता सुपर 30 चित्रपटालाही पायरसीचे ग्रहण लागले आहे.
हा चित्रपट पाटणाच्या गणितज्ञ आनंद कुमार आणि त्याच्या विद्यार्थ्यांच्या जर्नीवर बनली आहे. आनंद कुमार अशी व्यक्ती आहे, ज्याने गरीब आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आयआयटी परीक्षा उत्तीर्ण करणे शक्य असल्याचे जगाला दाखवून दिले आहे. यात आनंद कुमार यांच्या भूमिकेत हृतिक रोशन दिसणार आहे. त्याच्यासोबतच पंकज त्रिपाठी, मृणाल ठाकूर यांनीही या चित्रपटात स्क्रीन शेअर केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे.