Alert! तुमच्या गाडीवर त्वरित हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावून घ्या, अन्यथा ‘ही’ कामे करता येणार नाहीत

| Updated on: Dec 08, 2020 | 10:05 PM

तुम्ही तुमच्या कारमध्ये जर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (High Security Registration Plate) लावली नसेल तर तातडीने लावून घ्या. अन्यथा तुमच्या अडचणींमध्ये वाढ होऊ शकते.

Alert! तुमच्या गाडीवर त्वरित हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावून घ्या, अन्यथा ही कामे करता येणार नाहीत
Follow us on

मुंबई : तुम्ही तुमच्या कारमध्ये जर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (High Security Registration Plate) लावली नसेल तर तातडीने लावून घ्या. अन्यथा तुमच्या अडचणींमध्ये वाढ होऊ शकते. तुम्ही तुमच्या कारमध्ये हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावली नाही तर तुमच्याविरूद्ध कारवाई केली जाऊ शकते. (Install the high security registration plate on the vehicle immediately)

एचएसआरपी (HSRP) नसल्यास आरटीओमध्ये कारशी संबंधित कोणतेही काम तुम्ही करू शकणार नाही. म्हणूनच, शक्य तितक्या लवकर ऑनलाइन अर्ज करून हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावून घ्या. तुमच्या गाडीवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावलेली नसेल तर तुमच्या गाडीचं फिटनेस प्रमाणपत्र जारी केलं जाणार नाही. वाहन हस्तांतरण आणि चालानसंबंधित कोणतीही कार्यवाही होणार नाही. तसेच विमादेखील काढता येणार नाही.

काय आहे HSRP?

HSRP एक होलोग्राम स्टीकर असतं, ज्यावर वाहनाच्या इंजिनाचा नंबर आणि चेसिस नंबर असतात. हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (High Security Registration Plate) वाहनाची सुरक्षा आणि सुविधांना नजरेसमोर ठेवून बनवली आहे. हा नंबर प्रेशर मशीनद्वारे लिहिलेला असतो. या प्लेटवर एक प्रकारचा पिन नंबर असतो, जो तुमच्या वाहनाशी जोडलेला असतो. हा पिन एकदा वाहन प्लेटशी जोडला गेल्यानंतर दोन्ही बाजूने लॉक होईल. त्यानंतर कोणीही हे लॉक ओपन करु शकणार नाही.

किती खर्च होईल.

चारचाकी वाहनाच्या रजिस्ट्रेशनसाठी 600 ते 1100 रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. जर तुम्ही दुचाकी वाहन रजिस्टर करत असाल तर 300 ते 400 रुपयांचा खर्च होऊ शकतो.

ऑनलाईन अर्ज कसा कराल?

हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आणि कलर कोड स्टीकर लावण्याची प्रक्रिया खूपच सोपी बनवली आहे. हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावण्यासाठी दोन पोर्टल्स तयार करण्यात आले आहेत. त्यासाठी bookmyhsrp.com/index.aspx वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर खासगी किंवा सार्वजनिक वाहनाशी संबंधित पर्यायाची निवड करावी लागेल. त्यानंतर स्टेप बाय स्टेप अर्ज पूर्ण होईपर्यंत माहिती देत राहा. जर तुमच्या गाडीवर रजिस्ट्रेशन प्लेट लावली असेल आणि तुम्हाला केवळ स्टीकर लावायचं असल्यास तुम्ही www.bookmyhsrp.com पोर्टलला भेट द्या.

संबंधित बातम्या

जुन्या गाडीच्या बदल्यात नवी गाडी घेऊन जा; सरकारकडून विशेष सूट

Crash Test : टाटा नेक्सॉन, ह्युंदाई वेन्यू ते ईकोस्पोर्ट, ‘या’ पाच सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही सुरक्षित आहेत का?

Crash Test : क्रॅश टेस्टमध्ये मारुती, टाटा आणि महिंद्राच्या ‘मेड इन इंडिया कार’ पास की नापास?

(HSRP : High Security Number Plate Online Registration; check full process here)