मुंबई : ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून निर्माता क्षितीज प्रसादला (Kshitij Prasad) अटक करण्यात आली आहे. क्षितीज, करण जोहरच्या ‘धर्मा प्रोडक्शन’चा संचालक असून, त्याने या प्रकरणात चार बड्या सेलिब्रिटींची नावे घेतली आहेत. तसेच, या ड्रग्ज प्रकरणात आपल्याला अडकवले जात असल्याचा दावा त्याने केला आहे. शानिवारी (26 सप्टेंबर) अटक करण्यात आलेल्या क्षितीज प्रसादला चार दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्यात येणार आहे (I am being framed said kshitij Prasad during NCB Interrogation).
शुक्रवारी (25 सप्टेंबर) क्षितीज प्रसादला चौकशीसाठी एनसीबीकडून (NCB) समन्स बजावण्यात आला होता. तब्बल 27 तास त्याची चौकशी करण्यात आली. मात्र, या चौकशीत (Interrogation) समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्याला अटक करण्यात आली. न्यायालयात हजर करण्यापूर्वी त्याला वैद्यकीय तपासणी नेण्यात आले होते. यावेळी त्याने आपल्याला या प्रकरणात अडकवले जात असल्याचा दावा केला आहे.
निर्माता क्षितीज प्रसाद (Kshitij Prasad) याने एनसीबी चौकशीत (NCB Interrogation) अनेक मोठ्या नावांचा खुलासा केला आहे. या दरम्यान त्याने चार मोठ्या बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे घेतली आहेत. यात दोन कलाकार, तर इतर दोन निर्मात्यांची नावे असल्याचे समजते आहे. रकुल प्रीत सिंहने चौकशीदरम्यान क्षितीज प्रसादचे नाव घेतले होते. क्षितीज अनेकांना ड्रग्ज उपलब्ध करुन देण्याचे काम करायचा, असे रकुल प्रीतने सांगितले होते. (I am being framed said kshitij Prasad during NCB Interrogation)
क्षितीज प्रसादची ड्रग्ज चॅट (Drug Chat) एनसीबीच्या हाती लागली असून, यातून अंकुश अर्नेजा, अनुज केसवानी, करमजीत यांची नावे समोर आली आहेत. या संभाषणात त्यांनी हॅश आणि एमडीएमए या ड्रग्जची मागणी केली होती. या प्रकरणी अंकुश अर्नेजालाही एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. चौकशी दरम्यान त्याने कधी कधी गांजा सेवन करत असल्याची कबुली दिली आहे. मात्र, या व्यतिरिक्त कुठलेही ड्रग्ज घेतले नसल्याचे त्याने म्हटले आहे.
या सर्व प्रकरणानंतर चित्रपट दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) याने एक पत्रक जारी केले आहे. ‘माझ्या घरात ड्रग्स पार्टी झाली नाही. माझ्यावर होत असलेले आरोप खोटे आहेत. क्षितीज रवी प्रसाद आणि अनुभव चोप्रा यांचा धर्मा प्रॉडक्शनशी काहीही संबंध नाही’, असे करण जोहर स्पष्ट केले आहे.
(I am being framed said kshitij Prasad during NCB Interrogation)
VIDEO : Drug Case | करण जोहरच्या पार्टीचा व्हिडीओ खरा, करण जोहरची NCB चौकशी करणार? https://t.co/XtcGqaLYYG
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 27, 2020
संबंधित बातम्या :
‘धर्मा प्रोडक्शन’चे निर्माता क्षितीज प्रसादची 27 तास चौकशी, समाधानकारक उत्तर न दिल्याने अटक
ड्रग्ज प्रकरणात ‘धर्मा प्रोडक्शन’चे नाव, निर्माता क्षितीज प्रसादला एनसीबीचा समन्स