हैदराबाद: केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांकडून सुरु असलेल्या आंदोलनावर (Farmers protest) रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी प्रतिक्रिया दिली. शेतकऱ्यांचे हे आंदोलन राजकीय हेतून प्रेरित असल्याचे मी कधीच म्हटले नव्हते. आतादेखील माझे तसे मत नाही, असे अमित शाह यांनी स्पष्ट केले. (Amit Shah reaction on Chaol Delhi Farmers protest)
केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने मोर्चा काढला आहे. दिल्ली-हरियाणाच्या सीमेवर म्हणजे सिंघु-टकरी येथे सध्या शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. शेतकरी संघटना दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर आंदोलन करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. तर अमित शाह यांनी शेतकऱ्यांना बुरारी मैदानावर जमण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतरच शेतकऱ्यांशी चर्चा केली जाईल, असा पवित्रा केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र, शेतकरी संघटनांना हा प्रस्ताव मान्य नाही.
या वादात आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही उडी घेतली आहे. केंद्र सरकारने तात्काळ शेतकऱ्यांनी बिनशर्त चर्चा करावी, असे ट्विट अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
We’ll not go to Burari (Delhi). Our 30 farmers’ organisations take decisions after consensus is developed. Our leaders will brief media about it later today: Baldev Singh Sirsa, Farmers’ leader at Singhu border (Delhi-Haryana) on Home Minister’s offer to hold talks before 3rd Dec pic.twitter.com/edbacYjaGm
— ANI (@ANI) November 29, 2020
गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचा जमाव अडवण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. अश्रुधुर, वॉटर कॅनन आणि पोलिसी बळाचा वापर करत शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला. मात्र, हे सर्व प्रयत्न फोल ठरले आहेत.
आता सिंघु बॉर्डरवर पोलीस आणि सुरक्षा दलांनाच दोन्ही बाजूंनी शेतकऱ्यांचा वेढा पडल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तरन तारण आणि अमृतसरवरुन ट्रॅक्टर घेऊन शेतकऱ्यांचा नवा जमाव याठिकाणी दाखल झाला आहे. ते दिल्लीहून सिंघु येथे दाखल झाले आहेत. त्यामुळे पोलीस आणि सुरक्षा दलांच्या दोन्ही बाजुंना शेतकऱ्यांचे जमाव उभे ठाकले आहेत.
संबंधित बातम्या:
नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांच्या समस्या दूर होतील; पंतप्रधान नरेंद्र मोदींना विश्वास
‘अमित शाह यांचं आवाहन स्वीकारा’, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची आंदोलक शेतकऱ्यांना विनंती
(Amit Shah reaction on Chalo Delhi Farmers protest)