‘काश्मीरधील कलम 370 हटवलं, आता काश्मिरी मुलीसोबत लग्न करणार’

| Updated on: Aug 05, 2019 | 5:51 PM

राज्यसभेत आज (सोमवार) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कलम 370 अंतर्गत जम्मू-काश्मीरसाठीचे विशेषाधिकार रद्द करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर याचे देशभरात पडसाद उमटत आहेत.

काश्मीरधील कलम 370 हटवलं, आता काश्मिरी मुलीसोबत लग्न करणार
Follow us on

नवी दिल्ली : राज्यसभेत आज (सोमवार) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कलम 370 अंतर्गत जम्मू-काश्मीरसाठीचे विशेषाधिकार रद्द करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर याचे देशभरात पडसाद उमटत आहेत. अनेकांनी या निर्णयानंतर जल्लोष साजरा केला, तर अनेकांनी या निर्णयाची चिकित्सा करत टीकाही केली. मात्र, काही प्रतिक्रिया अगदीच मजेशीर आहेत.

अभिनेता कमाल राशिद खान (KRK) यांनी जम्मू काश्मीरमधील कलम 370 वर अशीच काहीशी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. KRK ने ट्वीट केले, “आता एखादी सुंदर काश्मिरी मुलगी माझ्यासोबत लग्न करण्यासाठी तयार झाली, तर मी तेथे एक मोठा बंगला खरेदी करण्यासाठी तयार आहे. चला पृथ्वीवरील स्वर्गात एक सुंदर आयुष्य जगू.”


कमाल यांनी आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटले आहे, “पंतप्रधान मोदी त्यांची आश्वासने पूर्ण करत नव्हते, म्हणून मला मोदी राज आवडत नव्हते. आता ते त्यांनी दिलेली आश्वासनं पूर्ण करत आहेत, त्यांनी कलम 370 रद्द केले आहे. त्यामुळे आता मला ते आवडतात. त्यांनी आपले राम मंदिराचे दुसरे आश्वासन पूर्ण केल्यास मला ते अधिक आवडतील. कारण लोकांनी त्यांना त्यांच्या आश्वासनावरच मतदान केले आहे.”


‘पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह हे खऱ्या मैत्रीचं उदाहरण’

कमाल राशिद खान यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या मैत्रीचं तोंड भरुन कौतुक केलं. ते म्हणाले, “भारताकडे अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्याइतका हुशार आणि शक्तीशाली नेता कधीही नव्हता. ते दोघे खऱ्या मैत्रीचं उत्तम उदाहरण आहे. त्या दोघांनी कठीण परिस्थितीत देखील एकमेकांची साथ सोडली नाही. त्यामुळे ते दोघे आज देशावर राज्य करत आहेत.”


कमाल यांच्या या ट्वीटनंतर युजर्सने त्यांची चांगलीच मजा घेतली. एका युजरने काश्मीरी मुली स्वाभिमान नसलेल्यांशी लग्न करत नसल्याचे म्हणत कमाल यांना टोला लगावला. अन्य एका युजरने म्हटले, “मेहबूबा मुफ्ती यांना प्रपोज करण्याची तुमची हिंमत कशी झाली.”

‘काश्मीरच्या मुद्द्यावर मुस्लीमांवर संशय घ्यायला नको’


कमाल म्हणाले, “काश्मीरच्या प्रकरणात मुस्लीमांवर संशय नको घ्यायला. एकही मुस्लीम कलम 370 रद्द करण्याच्या विरोधात नाही. मुस्लीमांना तेथील संपत्ती खरेदी करण्याची परवानगी नाही. मुस्लीमांना काश्मिरी मुलींसोबत लग्नाची परवानगी नाही. म्हणजे काश्मिरी मुस्लीमांना आम्ही देखील आवडत नाही.”