नागपूर : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारने (Tukaram Mundhe on Lock down) चार शहरं लॉकडाऊन केली आहेत. मात्र तरीही रस्त्यावरील गर्दी न हटल्याने, नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे अक्शन मोडमध्ये (Tukaram Mundhe on Lock down) आले आहेत. “विनंती करुनही घराबाहेर पडत असाल तर आम्ही जबरदस्तीने तुम्हाला घरी बसवू, ती वेळ आणू नका, आता विनंती करतोय, जबरदस्ती करायला लावू नका, आताच मदत करा, जबरदस्तीची वेळ आणू नका” असं तुकाराम मुंढे यांनी ठणकावून सांगितलं.
लॉकडाऊनचा अर्थ केवळ दुकानं आणि कार्यालये बंद करणे असा नाही, तर लोकांनीही घराबाहेर न पडणे असा आहे. मात्र अजूनही रस्त्यावर अनेक गाड्या, लोक दिसत आहेत. लोकांनी घरी बसणे गरजेचं आहे, वारंवार आवाहन करुनही नागरिकांना गांभीर्य नाही हे दु:खद आहे, अशी खंत तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केली.
लॉकडाऊनचा अर्थ घरी थांबणे हा आहे. मात्र रस्त्यावर गाड्या, लोक फिरताना दिसत आहेत. आपण आपल्या सुरक्षेसाठी, जनतेच्या सुरक्षेसाठी घरात थांबा. बाहेर फिरल्याने जर संसर्ग झाला तर त्यानंतर काळजी घेण्यापेक्षा आधीच काळजी घेतलेली बरी, माझी विनंती आहे, घराबाहेर पडू नका, असं तुकाराम मुंढे म्हणाले.
नागपूर शहराला लॉक डाऊन केलं त्याची अंमलबजावणी सुरु आहे. मी अनेक भागाचा दौरा केला. दुकानं बंद झाली आहेत, मात्र रस्त्यावर वाहने आणि नागरिक दिसून येत आहेत हे चुकीचं आहे. ही दुःखद गोष्ट आहे. नागरिकांनी गांभीर्याने घेतलं नाही. होम क्वारंटाईन हे जनतेसाठी आहे.
लॉक डाऊनचा अर्थ नागरिकांनी समजून घ्यावा हे सगळं नागरिकांच्या आरोग्यासाठी आहे. तरी जनता रस्त्यावर येत असेल तर याचा दुष्परिणाम होईल. आरोग्याचा धोका निर्माण होऊ शकतो. मी पुन्हा विनंती करतो की नागरिकांनी घराबाहेर पडू नका. नाही तर आम्हाला फोर्स करून तुम्हाला घरी बसायला लावावं लागेल. आता तुमच्या हातात आहे, तुम्ही स्वतः हे करता की आम्हाला तुमच्यावर फोर्सफुली अॅक्शन घ्यायची, अशी विचारणा तुकाराम मुंढे यांनी केली.
आम्ही आढावा घेत आहोत त्यानुसार स्थिती नियंत्रणात आहे. मात्र तुम्ही आम्हाला साथ दिली नाही तर स्थिती बिघडू शकते. आम्ही नाका बंदी आणि पेट्रोलिंग सुरू केली आहे., असं मुंढे म्हणाले.
संबंधित बातम्या
‘ना फेरफटका, ना मॉर्निंग वॉक’, नागपूर लॉकडाऊननंतर तुकाराम मुंढेंचे कडक नियम
Reduce AC use | एसीचा वापर कमी करा, आरोग्य मंत्र्यांचा सल्ला, दिवसभरात 11 नवे कोरोना रुग्ण